गणेश मुर्तीची विटंबना करणारे अविनाश बागवे यांना जामीन मंजुर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

गणेश मंडळाची विजर्सन मिरवणुक जात असताना कार्यकर्त्यांना ओढा रे, मारा, सोडू नका असे म्हणून चिथावणी देवुन ट्रॅक्टर चालक व साऊंड सिस्टीमच्या मालकास मारहाण करण्यास सांगणार्‍या तसेच गणेश मुर्तीची विटंबना केल्याप्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांना खडक पोलिसांनी अटक केली होती.  अविनाशस बागवे यांच्यासह त्यांच्या ६ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. अविनाश बागवे यांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायानलयाने त्यांचा जामीन अर्ज मंजुर केला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f6119ae8-c0c1-11e8-837f-f75fe80a799c’]

युवराज सुलतान अडसुळ (27, रा. राजीव गांधी सोसायटी, कासेवाडी, भवानी पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खडक पोलिसांनी अविनाश बागवे, यासेर बागवे, विवेक उर्फ बंटी बागवे, दयानंद अडागळे, जयवंत मोहिते, सुरज कांबळे, कुमार अडागळे, नितीन कसबे, बापु कसबे, गणेश जाधव, बागवे यांचे पीए अरूण गायकवाड, सुरेखा खंडाळे, विठ्ठल खोरात, परेश गुरव, अविनाश बागवे यांचे मेहुणे सुरज कांबळे आणि शिवाजी काळे (सर्व रा. कासेवाडी, भवानीपेठ) यांच्याविरूध्द भादंवि 143,146,148,149,295,296,323,427,504, महाराष्ट्र कायदा कलम 37 (1)(3) सह कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करुन खडक पोलिसांनी अविनाश बागवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली.

सर्जिकल स्ट्राइकचे हिरो संदीप सिंग यांना वीरमरण 

रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भवानीपेठेतील कासेवाडी येथील अशोक तरूण मंडळाची मिरवणुक विजर्सनासाठी राजीव गांधी पतसंस्थेच्या समोरील सार्वजनिक रोडवरून जात होती. त्यावेळी अविनाश बागवे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना ओढा रे, मारा, सोडू नका असे म्हणून चिथावणी दिली. त्यांनी ट्रॅक्टर चालक सोमनाथ मस्के आणि साऊंड सिस्टीमचे मालक ओंकार पंढरीनाथ कोळी यांना मारहाण करण्यास  सांगितले. आरोपींनी मस्के आणि कोळी यांना हाताने मारहाण केली तसेच साऊंड सिस्टीमची तोडफोड करून नुकसान केले. आरोपींनी गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीस अडथळा निर्माण केला. आरोपींनी पायातील बुट, चप्पल, दगड फेकुन गोंधळ घातला आणि मिरवणुकीदरम्यान गणेश मुर्तीची विटंबना केली.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0f45a172-c0c2-11e8-9673-7f57f78684f7′]

घटनेची माहिती मिळताच खडक पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजयकुमार शिंदे आणि सहाय्यक निरीक्षक जे.सी. मुजावर यांनी घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, परिस्थिती व्यवस्थितरित्या हाताळली. गुन्हयाचा पुढील तपास खडक पोलिस करीत आहेत

मालदीवला चीनपासून मिळणार मुक्ती ?