Avinash Bhosale | पुण्यातील सुप्रसिध्द बिल्डर अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना सीबीआयने (CBI) अटक (Arrest) केली आहे. अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांची यापूर्वी ईडी (ED) आणि सीबीआयनं चौकशी (Inquiry) केली होती. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीएचएफएल प्रकरणात (DHFL Case) भोसले यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सीबीआय अविनाश भोसले यांचा शोध घेत होते. ईडीनं यापूर्वी फेमा कायद्यांतर्गत (Foreign Exchange Management Act) भोसले यांची चौकशी केली होती.

 

सीबीआयनं गेल्या काही दिवसांपासून भोसले यांच्या घरी छापे टाकले होते. अविनाश भोसले यांना अटक केल्यानंतर सीबीआय नेमकी काय कारवाई करणार हे येणाऱ्या काळात समोर येईल. ईडीनं गेल्यावर्षी अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांची संपत्ती जप्त (Property seized) केली होती. डीएचएफएल प्रकरणात सीबीआयकडून त्यांचा शोध घेतला जात होता.

40 कोटींची संपत्ती जप्त
अविनाश भोसले यांच्यावर ईडीने गेल्यावर्षी कारवाई केली होती. भोसले यांची 40 कोटींची संपत्ती गेल्यावर्षी जूनमध्ये जप्त करण्यात आली होती.
त्यांच्या व्यावसायिक भागीदारांवर देखील छापे टाकण्यात आले होते.
डीएचएफएल येस बँक लोन प्रकरणी (Yes Bank Loan Case) अविनाश भोसले यांच्यावर सीबीआयने ही कारवाई केली आहे.
सीबीआयनं अटकेची कारवाई करण्यापूर्वी 30 एप्रिल रोजी छापे टाकल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

 

Web Title :- Avinash Bhosale | Avinash Bhosale, promoter of ABIL group of companies, arrested by CBI today in connection with the DHFL-Yes bank loan case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | चुलत भावाला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

 

CP Amitabh Gupta | ‘गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक हा कायमच असला पाहिजे’

 

Stress Free Sleeping Tips | ‘या’ पद्धतीने घ्या झोप, 4 तासांमध्येच 8 तासांची झोप होईल पूर्ण