Avinash Bhosale | बिल्डर अविनाश भोसलेंना न्यायालयीन कोठडी, CBI कस्टडी वाढवून देण्यास कोर्टाचा नकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune) बांधकाम व्यावसायिक (Builders) अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांची रवानगी आता कारागृहात (Jail) करण्यात आली आहे. सीबीआयनं (CBI) मागितलेली आणखी 5 दिवसांची वाढीव कस्टडी नाकारत बुधवारी (दि.8) कोर्टानं अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली. रिमांड संपत असल्याने बुधवारी भोसले यांना पुन्हा मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Sessions Court) विशेष सीबीआय कोर्टात (Special CBI Court) हजर करण्यात आलं होतं. आर्थर रोडमध्ये (Arthur Road) सध्या नव्या कैद्यांसाठी जागा नसल्याने भोसले यांना नवी मुंबईत तळोजा कारागृहात (Taloja Jail) हलवण्याची शक्यता आहे.

 

येस बँक (Yes Bank) आणि डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणी (DHFL Fraud Case) सीबीआयनं अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना अटक (Arrest) केली आहे. चार दिवसांच्या नजरकैदेनंतर त्यांना 10 दिवस तपास यंत्रणेच्या ताब्यात ठेवण्याचे निर्देश विशेष सीबीआय कोर्टनं दिले होते. या कालावधीत त्यांना सीबीआयची टीम चौकशीकरता दिल्लीला घेऊन गेली होती. अविनाश भोसले यांच्या वतीने या वाढीव रिमांडला विरोध करण्यात आला होता. आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी भोसले यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने 26 मे रोजी अटक केली होती.

काय आहे प्रकरण?

– येस बँक आणि डीएचएफएल घोटाळाप्रकरणी ईडी (ED), सीबीआयकडून याआधी चौकशी

– 2018 साली एप्रिल ते जून दरम्यान हजारो कोटी रुपये एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळते करण्यात आले.

– वाधवान यांना येस बँकेकडून कर्ज मिळवून दिल्याचा आरोप

– सीबीआयच्या मते यात मोठ्या उद्योजकांच्या कंपन्यांचा समावेश होता.

– बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, चित्रपट निर्माते संजय छाब्रिया (Filmmaker Sanjay Chhabria), बलवा आणि गोएंका यांचा समावेश

– ईडीकडून याआधी अविनाश भोसले यांची 40 कोटींची संपत्ती जप्त

 

Web Title :- Avinash Bhosale | cbi court grant jc to pune based builder avinash bhosale

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rupali Chakankar | खडकवासला ठरणार महाराष्ट्रातील पहिला विधवाप्रथा मुक्त मतदारसंघ ; रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली होणार ठराव मंजूर

 

Maharashtra MLC Elections 2022 | उमेदवारी डावलल्यानंतर विनायक मेटेंचा सवाल; म्हणाले – ‘भाजपने आम्हाला फक्त वापरून घेतलं का?’

 

Pune HSC Students Suicide | पुण्यात 12 वीत नापास झालेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या, आई-वडिलांना बसला मोठा धक्का