Avinash Bhosle | ईडीकडून प्रसिध्द बिल्डर अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची 40.34 कोटींची मालमत्ता जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   अंमलबजावणी संचालनालयाने (ED) विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा 1999 1999 (फेमा) अंतर्गत विविध मालमत्तांच्या रूपात अविनाश भोसले (Avinash Bhosle) आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची 40.34 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. परदेशी ठेवी / मालमत्तांच्या समकक्ष मूल्याच्या रूपात या मालमत्ता जप्त केल्या आहेत. Avinash Bhosle | ED has seized assets worth Rs. 40.34 Crore belonging to Avinash Bhosle and his family members under FEMA, 1999.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

फेमा 1999 नुसार भारताबाहेरील परदेशी ठेवी/अचल मालमत्ता ज्या भारताबाहेर आहेत.
त्या सममूल्य जप्त करण्याची तरतूद आहे.
ताब्यात घेतलेली मालमता इक्विटी शेयर आणि प्रेफरन्स शेयरच्या रूपात आहे.
ज्यात पुणे येथील क्लासिक सिटी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड, पुणे, जिने तीन पंचतारांकित हॉटेल ई. खरेदी केली आहेत.

हॉटेल वेस्टिन, पुणे, हॉटेल ले, मेरिडियन, नागपूर, हॉटेल डब्ल्यू रिट्रीट अँड स्पा, गोवा.

तसेच, एबीआयएल (Avinash Bhosale Infrastructure Pvt) मधील इक्विटी शेयर आणि बँक बॅलन्स रु. 1.15 कोटी रुपये जो अविनाश भोसले आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर आहे.
तो जप्त करण्यात आला आहे.
ईडीला फेमा 1999 च्या उल्लंघनाच्या 2017 मध्ये केलेल्या तपासात अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दुबईत स्थावर मालमत्ता घेतल्याची माहिती मिळाली होती.

तपासात उघड झाले की, अविनाश भोसले (Avinash Bhosle) आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दुबईतील रॉचडेल असोसिएट्स लिमिटेड कंपनीच्या (Rochdale Associates Limited Company) परदेशी ठेवी घेतल्या होत्या.
ज्यात 20,00,000 एईडी ची मालमत्ता (भारतीय रूपयात 40,34,00,000) होती.
ही मालमत्ता संपादन करण्यासाठी अविनाश भोसले (Avinash Bhosle) आणि त्यांच्या कुटुंबियांनी भारताबाहेर असलेल्या बँक खात्यात लिब्रलाईज रेमिटन्स योजनेच्या माध्यमातून हा निधी पाठविला.

वेगवेगळ्या श्रेणींमध्ये म्हणजेच कंपनी रॉचडेल असोसिएट्स लिमिटेड, दुबईमधील इक्विटी शेअर्स खरेदी करण्यासाठी, कुटुंब देखभाल, कुटुंब देखभालीसाठी एनआरआयकडून मिळालेली बचतीची रक्कम इ. परंतु, जमा केलेला पैसा संपत्ती खरेदी करण्यासाठी वापरला गेला.
आणि कंपनीच्या शेअर्ससाठी वापरण्यात आला.
कंपनी रिअल इस्टेट व्यवसायात गुंतलेली आहे असे घोषित करण्यात आले होते.
मात्र, तपासात कंपनीचे कोणतेही अशाप्रकारचे व्यवसायिक व्यवहार दिसून आले नाहीत.
आणि यातून कोणतेही उत्पन्न निर्माण झालेले आढळले नाही. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Web Title : Avinash Bhosle | ED has seized assets worth Rs. 40.34 Crore belonging to Avinash Bhosle and his family members under FEMA, 1999.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PF News | कोरोना काळात नोकरी गमावणार्‍या कर्मचार्‍यांचे PF चे योगदान मार्च 2022 पर्यंत देणार सरकार