Avinash Ramesh Bagwe | काँग्रेसचे अविनाश बागवे यांचं नगरसेवक पद न्यायालयाकडून रद्द, पण कोर्टाच्या आदेशाला स्थगिती

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – माजी गृहराज्यमंत्री, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे (Pune City Congress Committee President Ramesh Bagwe) यांचे चिरंजीव अविनाश बागवे (Avinash Bagwe) यांचं नगरसेवक (Corporator) पद मुख्य लघुवाद न्यायालय, पुणे यांनी रद्द केलं आहे. पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत (General election) आविनाश बागवे (Avinash Bagwe) यांनी प्रभाग 19 अ मधून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात व नामनिर्देशन फॉर्ममध्ये (affidavit and nomination form) दिलेली माहिती ही विसंगत व अपूर्ण तसेच खोटी असल्याची तक्रार मनसेचे भूपेंद्र रामभाऊ शेडगे (MNS Bhupendra Rambhau Shedge) यांनी केली होती. मुख्य लघुवाद न्यायालयाने (Chief Minority Court) दिलेल्या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) रिट पिटीशन (Writ petition) दाखल करणार असल्याचे अविनाश बागवे (Avinash Ramesh Bagwe) यांनी म्हटले आहे. दरम्यान, कोर्टाने नगरसेवक पद रद्द केल्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पुणे महानगरपालिकेच्या 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये (Pune Municipal Corporation’s 2017 General Election) अविनाश बागवे (Avinash Bagwe) आणि अ‍ॅड. भूपेंद्र शेडगे (Adv. Bhupendra Shedge) यांनी प्रभाग 19 अ मधून एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. बागवे हे काँग्रेस पक्षाकडून तर शेडगे हे मनसेकडून निवडणूक लढवली होती. अर्ज छाननीच्या वेळी अविनाश बागवे यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये व नामनिर्देशन फॉर्ममध्ये दिलेली माहिती ही विसंगत व अपूर्ण तसेच खोटी असल्यामुळे भूपेंद्र शेडगे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे हरकत उपस्थित केली होती. परंतु त्याची हरकत फेटाळून लावली.

निवडणूक अधिकाऱ्यांनी शेडगे यांची हरकत फेटाळून लावल्याने शेडगे यांनी मुख्य लघुवाद न्यायालय पुणे येथे निवडणूक याचिका (Election petition) दाखल केली होती. या निवडणूक याचिकेमध्ये झालेल्या साक्षी, तपासणी, उलटतपासणी, पुरावे व दाखल कागदपत्रे या सर्व बाबींचा विचार करुन तसेच कायद्याच्या तरतुदींचे विचार करुन न्यायालयाने 29 जून रोजी निकाल दिला. न्यायालयाने महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1969 चे कलम 10 (1) (डी) अन्वये अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द केले. या प्रकरणात भूपेंद्र शेडगे यांच्यावतीने अ‍ॅड. नरेश गायकवाड Adv. Naresh Gaikwad, अ‍ॅड. रफिक शेख Adv. Rafiq Sheikh, अ‍ॅड. योगेश डावरे Adv. Yogesh Daware यांनी काम पाहिले.

 

उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल करणार

मुख्य लघुवाद न्यायालयाने अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा निकाल दिला. दरम्यान, कोर्टाने नगरसेवक पद रद्द केल्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. यानंतर अविनाश बागवे यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल करणार असल्याचे सांगितले. तसेच मुंबई उच्च न्यायालयात न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Web Titel :- Avinash Ramesh Bagwe | Congress cancels Avinash Bagwe’s corporator post

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Delta Variant | ‘या’ 5 प्रकारच्या लोकांना आहे ’डेल्टा व्हॅरिएंट’चा जास्त धोका, व्हायरसपासून वाचण्यासाठी करा ‘ही’ 8 कामे; जाणून घ्या

स्मार्टफोन चोरीला गेला तर सर्वप्रथम करा ‘ही’ 4 कामे, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या

Pune News | पुण्याच्या बिबवेवाडीत हॉटेलला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरु

स्वत:ला महाशक्ती दर्शवण्याच्या प्रयत्नात चीनच्या एयरफोर्सकडून झाली ‘ही’ मोठी चूक, जगभरात झाले हसू