Avoid Cold-Cough | बदलत्या हवामानात सर्दी-खोकल्यापासून वाचण्यासाठी ‘या’ वस्तूंचे करा सेवन, जाणून घ्या

नवी दिल्ली : Avoid Cold-Cough | हवामान आता वेगाने बदलू लागले आहे. ज्यामुळे अनेक लोकांची प्रकृती सुद्धा बिघडू लागली आहे. हवामानातील हे परिवर्तन वायरल फिव्हर, घशाची खवखव, खोकला आणि तापासारख्या आजारांचे कारण ठरते. अशावेळी इम्युनिटी मजबूत करून आजारांपासून बचाव करता येऊ शकतो. जास्त चिंता करून नका, आम्ही अशा काही वस्तू सांगणार आहोत ज्या बदलत्या हवामानात खाल्ल्याने सर्दी, खोकला, तापासारख्या समस्या (Avoid Cold-Cough) दूर राहतील.

 

1. आपल्या दिवसाची सुरूवात खोबरेल तेलाने करा –

आपल्या दिवसाची सुरुवात रिकाम्यापोटी खोबरेल तेलाने करा. खोबरेल तेलात हेल्दी फॅट असते, जे आरोग्याला एकापेक्षा जास्त पद्धतीने मजबूत करते. खोबरेल तेल तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगले आहे.

 

2. दररोज आल्याचे सेवन करा –

आले भारतीय स्वयंपाक घरात आढणारी सामान्य वस्तू आहे. तिचा वापर चहा बनवण्यासाठी केला जातो. आल्यात जिंजरॉल असते. ज्यामध्ये शक्तीशाली औषधी गुण असतात. यासाठी तुम्ही नेहमी आले आणि आवळ्याचा शॉट घेऊ शकता. यामुळे खोकला-सर्दी दूर राहते. (Avoid Cold-Cough)

 

3. बी-पॉलेनचे सेवन करा –

बी पॉलेनचे सेवन केल्याने अ‍ॅलर्जी रोखण्यास मदत होते. याचे सेवन केल्याने इम्युनिटी मजबूत होते. याचे रोज सेवन करा.

 

4. दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करा –

निरोगी राहण्यासाठी आपल्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करा. असे केल्याने पचनतंत्र मजबूत राहते. यामुळे अनेक आजारांपासून दूर राहू शकता. दिवसाची सुरूवात कोमट पाण्याने करा. (Avoid Cold-Cough)

 

Web Title :- Avoid Cold-Cough | eat these things to avoid cold and cough and home remedies health care tips

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा