Lockdown कालावधीत कुटुंब नियोजन करताना ताण-तणावाला दूर ठेवा : डॉ माधुरी बुरांडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देशभरात गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊन सुरु आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा मोठा परिणाम कुटुंब नियोजनावर झाला असून. अनेक जोडप्यांमध्ये अशा परिस्थितीत मुल जन्माला घालण्याची भिती वाटत आहे तर काहींना आर्थिक अडचणींमुळे कुटुंब नियोजन कसे करावे याची चिंता भेडसावू लागली आहे.

कोरोनाचा परिणाम हा गर्भवती माता व बाळावर मोठ्या प्रमाणात होत असल्याची चर्चा सर्वत्र होत असल्याने जोडप्यांमध्ये कुटुंब नियोजनबाबत संभ्रम पहायला मिळतो. कुठलाच शास्त्रीय आधार नसताना केवळ भितीपोटी कुटुंब नियोजन लांबविण्यात आल्याचे दिसून येते. एकंदरीतच या सा-याचा एकुण कुटुंब नियोजनवर मोठा परिणाम होत आहे. कोरोनात जोखीम नको म्हणू गर्भधारणा टाळली जात असल्याची अनेक उदाहरणे देखील समोर आली आहेत.

लॉकडाऊनच्या कालावधीत कुटुंब नियोजक करु इच्छिणा-या पालकांसाठी महत्त्वाच्या टिप्स

1. निराश होऊ नका. त्याऐवजी आपला दिवसभराचे नियोजन आखा आणि त्यानुसार आपला दिवस कसा चांगला जाईल यासाठी प्रयत्न करा. आपल्या आवडत्या गोष्टींची यादी करा आणि त्याकरिता पुरेसा वेळ द्या. आपल्या घरातील कामाचेही योग्य नियोजन आखा जेणेकरून तुमची धांदल उडणार नाही. थोडा स्वतःसाठी वेळ राखून ठेवा आणि आराम करा. आपल्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा.

2. नोंदवही तयार करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. आपल्या रोजच्या कामांची नोंद ठेवणारी वही तयार करा आणि त्यात आपले विचारही मांडणायाचा प्रयत्न करा.

3. मेडिटेशन आणि योगा यासारख्या पर्यांयाचा वापर करून मानसिक आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने आपण चिंता आणि नैराश्यावर मात करू शकता. तुम्हाला डिप्रेशनची समस्या आल्यास वेळीच तज्ञांची मदत घ्या.

4. तुम्हाला आनंद गोष्टी करा. वाचन, संगीत ऐकणे, स्वयंपाक करणे, कोडी सोडवणे, शैक्षणिक कार्यक्रम पाहणे, चित्रकला किंवा बागकाम अशा छंदांकरिता पुरेसा वेळ द्या.

5. घरी एकत्र व्यायाम केल्याने तणाव कमी होण्यास मदत होते. आपण आपल्या मुलांसह एरोबिक्स, स्ट्रेचिंग, चालणे किंवा बैठे खेळ खेळू शकता. तसेच संतुलित आणि निरोगी आहारावर भर द्या

6. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. कारण तणाव हे वंध्यत्वाचे एक कारण आहे.

7. विश्वासार्ह स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीवरच विश्वास ठेवा. अफवांवर विश्वास ठेवू नका.

8. आवश्यकतेनुसार समुपदेशनाची निवड करा. हे आपल्या सर्व शंका दूर करण्यात मदत करू शकते.

डॉ माधुरी बुरांडे लाहा (सल्लागार, प्रसुती व स्त्रीरोग तज्ञ, मदरहुड हॉस्पीटल ,खराडी, पुणे)