Avoid These 6 Foods in Lunch | सावधान ! लंचमध्ये चुकूनही घेऊ नका ‘या’ 6 गोष्टी, सेवन केल्याने येतो आळस; आजारी सुद्धा पडू शकता

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Avoid These 6 Foods in Lunch | ऑफिसदरम्यान तुम्ही बाहेर लंचमध्ये काहीही खाता का? जर उत्तर होय, असेल तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. तज्ज्ञ ही सवय चुकीची असल्याचे सांगतात आणि ती टाळण्यास सांगतात (Avoid These 6 Foods in Lunch). लंचमध्ये अशाप्रकारे बाहेर काहीही खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर कोणता परिणाम होतो ते जाणून घेवूयात…

 

लंचमध्ये काहीही खाल्ल्याने होतात या समस्या (These Foods You Should Never Eat For Lunch)
तज्ज्ञांच्या मते, दुपारच्या जेवणात काहीही खाणे आरोग्यासाठी हानिकारक (Harmful For Health) आहे. हे अन्न तुमच्या शरीरात विविध प्रकारच्या समस्या वाढवते आणि त्यामुळे तुमच्या फिटनेसवरही (Fitness) वाईट परिणाम होतो. हे पदार्थ खाल्ल्याने (Avoid These 6 Foods in Lunch) तुम्हाला खाली नमूद केलेल्या समस्या होऊ शकतात.

 

असे अन्न दिवसभर ऊर्जा (Energy) देत नाही.

थकवा जाणवतो (Feeling Tired).

हे अन्न भूक भागवू शकत नाही, ज्यामुळे वारंवार भूक लागते.

 

लंचमध्ये हे पदार्थ खाणे टाळा (Avoid Eating These Foods In Lunch)

 

1. दुपारच्या जेवणात व्हेजिटेबल सूप घेऊ नका (Vegetable Soup)
व्हेजिटेबल सूपमध्ये कॅलरीज (Calories) आणि इतर पोषक घटक (Nutrients) मोठ्या प्रमाणात असतात, परंतु प्रोटीन (Protein) अजिबात नसतत. जर तुम्ही ते दुपारच्या जेवणात घेतले तर तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहणार नाही ज्यामुळे तुम्हाला पुन्हा भूक लागेल. प्रोटीनच्या सेवनाने भूक लवकर लागत नाही, त्यामुळे जास्त खाण्याची इच्छाही होत नाही. यामुळेच लोकांना जास्त प्रोटीन खाण्याचा सल्ला दिला जातो.

 

त्यामुळे लंचमध्ये व्हेजिटेबल सूपचे सेवन टाळून चिकन सूप (Chicken Soup) घ्या. चिकन सूपमध्ये लीन प्रोटीन (Lean Protein) असते ज्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही. यासोबतच ओट्स (Oats), भात (Rice), सफरचंद (Apple) किंवा रोटी (Roti) यांचे सेवन करणे आवश्यक आहे.

2. फास्ट फूड टाळा (Fast Food)
यामध्ये जास्त प्रमाणात फॅट (Fat) आढळते, ज्यामुळे पोटासोबतच शरीर जड होते. यामुळे तुम्हाला सुस्ती (Lethargy) आणि थकवा (Fatigue) जाणवतो. यामुळेच दुपारच्या जेवणात हे टाळावे.

 

3. लंचमध्ये नका खाऊ पास्ता (Pasta)
पास्त्याला रिफाइंड कार्ब (Refined Carbs) असे म्हणतात जे सामान्यतः आरोग्यासाठी चांगले नसते. दुपारच्या जेवणात याचे सेवन केल्यावर तुम्हाला झोप येईल, याचा परिणाम कामासह तुमच्या प्रकृतीवर होऊ शकतो.

 

4. ग्रीन ज्यूस लंचमध्ये हानीकारक (Green Juice)
डॉक्टर म्हणतात, लोकांनी दुपारी पोट भरण्यासाठी ग्रीन ज्यूसचे सेवन करावे. पण प्रसिद्ध डाएटीशियन एक्सपर्ट व्हिटनी स्टुअर्ट (Whitney Stuart) यांच्या मते,
दुपारी ग्रीन ज्यूस घेणे आरोग्यासाठी चांगले नाही. याचे कारण म्हणजे लंचमध्ये संतुलित आहार (Balanced Diet) आवश्यक असतो,
ज्यामध्ये फायबर, प्रोटीन, कार्ब (Carbs) आणि फॅट असते, ज्यामुळे तुमचे पोट भरलेले राहते.

 

5. तळलेले अन्न खाणे टाळा (Fried Foods)
तज्ज्ञांचे म्हणतात की, दुपारच्या जेवणात तळलेले अन्न शक्य तेवढे टाळा. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
तळलेले अन्न तुमची चरबी वाढवते (Fat Increases) आणि त्यात कॅलरीजचे प्रमाण देखील जास्त असते, ज्याचा तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो.

 

6. स्टोअर केलेले सँडविच प्राणघातक (Stored Sandwich)
बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक सँडविचमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह (Preservative) आणि सॉस (Sauce) आढळतात,
ज्यामुळे तुम्हाला आळस येतो आणि त्यामुळे इतर आजार देखील होतात.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Avoid These 6 Foods in Lunch | do not take these 6 things even by forgetting in the afternoon lunch you can get lazy very sick

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | खुनाच्या प्रयत्नातील फरार तडीपार आरोपीला समर्थ पोलिसांकडून अटक

 

Weight Loss Hacks | तांदूळ शिजवताना पातेल्यात एक चमचा टाका ‘ही’ गोष्ट, आपोआप कमी होईल पूर्ण शरीरातील चरबी

 

Kendall Jenner Nude Photoshoot | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं केला न्यूड फोटो शेअर, अवघ्या काही तासांतच मिळाले 77 हजारांहून अधिक लाईक्स..