हे दोन पदार्थ टाळा, अन्यथा स्नायू होतील कमजोर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – काही पदार्थ खाण्यात आल्यास स्नायू कमजोर होतात. यासाठी हे पदार्थ डायटमधून पूर्णपणे टाळणे गरजेचे आहे. या पदार्थांमधील न्यट्रियंट्स स्नायू कमजोर करतात. कॉफी, मैद्यासारखे पदार्थ डायटमधून टाळावेत. दिवसभरात तीन कपांपेक्षा जास्त चहा किंवा कॉफी प्यायल्यास स्नायू कमजोर होतात.

मसल्स कमजोर होण्याची विविध कारणे आहेत. ती कारणे आपण जाणून घेणार आहोत. चहा, कॉफीमध्ये कॅफीन अधिक असते. दिवसातून तीन कपांपेक्षा जास्त चहा किंवा कॉफी प्यायल्याने स्नायू कमजोर होतात. तसेच मैद्याचे पदार्थ म्हणजे समोसे, कचोरी, पिझ्झा यामध्ये स्नायूसाठी आवश्यक प्रोटीनसारखी कोणतीच हेल्दी तत्त्वे नसल्याने ते जास्त खाल्ल्याने स्नायू कमजोर होतात.

स्नायू मजबूत होण्यासाठी प्रोटीनचे पदार्थ खाल्ले पाहिजेत. यामुळे डायटमध्ये रोज दूध, दही, पनीर काबुली चने आणि राजमाचा समावेश करावा. या पदार्थांमध्ये प्रोटीनसोबतच कॅल्शियम, फॉस्फरस असते. ज्यामुळे स्नायू बळकट होतात. स्नायू वाढवण्यासाठी दुसऱ्यांची पाहून एक्सरसाइज करू नका. आपल्या शरीरानुसार एक्सरसाइज केल्याने फायदा होईल. स्नायू कमजोर होण्याची अन्यही काही कारणे आहेत. ही कारणे जाणून घेणे गरजेचे आहे. जास्त फळांचा रस पिऊ नये. यामुळे स्नायू कमजोर होतात. केक, आइस्क्रीमसारखे गोड पदार्थ जास्त खाऊ नये. स्नायू कमजोर होतात. सोड्यासारखे पदार्थ डाएटमध्ये असल्यास हाडे आणि स्नायूंना नुकसान होऊ शकते.

गरजेपेक्षा जास्त एक्सरसाइज करू नका. स्नायूंवर निगेटिव्ह परिणाम होतो. डाएटमध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. दूध, दही, फिश, बदामासारख्या पदार्थांनी स्नायू मजबूत होतात. अ‍ॅब्ज स्ट्राँग होतात. स्नायू वाढवणारे औषध घेणे टाळावे. याचे साइड इफेक्ट्स होऊ शकतात. सिगारेट किंवा दारू प्यायल्याने मसल्स कमजोर होतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/