COVID-19 : हलकी कोरोना लक्षणे गंभीर संसर्गात बदलण्यापासून रोखण्यासाठी ‘या’ चुका टाळा; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – दररोज वाढणार्‍या कोरोना व्हायरसच्या प्रकरणांसह, आता लवकर डायग्नोसिस आणि योग्यवेळी उपचार सुरू करण्यावर जोर दिला जातो. सध्याच्या स्थितीत किरकोळ लक्षणांची सुद्धा देखरेख करणे आणि आवश्यक सावधगिरी बाळगणे महत्वाचे झाले आहे. येथे काही सामान्य चूका आहेत ज्या लोक करतात, ज्या कोविडसंबंधीत गंभीर कॉम्पलीकेशन्सच्या कारण ठरतात. या चूका जाणून घेवूयात…

हलक्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे
व्हायरसचे नवे रूप हलक्या संसर्गाला गंभीरमध्ये बदलू शकते. यासाठी डॉक्टर पहिल्या दिवसापासूनच सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतात. तापमान आणि अन्य संभाव्य लक्षणांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

जागृततेचा अभाव आणि नकार
जागृततेची कमतरता किंवा नकार देणे सर्वात मोठी चूक आहे, जी जीवन बरबदा करू शकते. कोविडची लक्षणे दिसली तर ती जाणून घ्या. हलक्या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका. कारण ती अतिशय अनियंत्रित होऊ शकतात. वेळीच लक्ष दिल्यास गंभीर कॉम्पलीकेशन्स टाळता येतील. यासाठी वेळेवर उपचाराचा कोर्स सुरू करणे नॉन-नेगोशिएबल आहे.

स्टेरॉईड उपचार खुप लवकर सुरू करणे
सूज नियंत्रित करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल रूग्णांना अनेक बाबतीत स्टेरॉईड दिले जाते. परंतु सर्वांनाच याची आवश्यकता नसते. हलक्या प्रकरणांत कन्सल्ट शिंवाय स्टेरॉईडचा वापर केल्याने ब्लॅक फंगस सारख्या समस्या होतात.

वेळेवर कोविड तज्ज्ञांचा सल्ला न घेणे
आणखी एक चूक जी कोरोना पॉझिटिव्ह करतात ती म्हणजे उशीराने डॉक्टरांशी संपर्क साधणे. एखाद्या एक्सपर्ट डॉक्टरच्या मार्गदर्शनाने तुम्ही लवकर बरे होऊ शकता. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पहिल्या दिवशीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टेस्टिंगमध्ये उशीर
कोरोना व्हायरसच्या कन्फ्यूजिंग नेचरमुळे, कारण याची लक्षणे फ्लू सारखीच असल्याने लोक नेहमी टेस्ट करण्यास उशीर करतात. लक्षणांना डायग्नोससाठी डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे आणि आवश्यक असेल तर टेस्ट केली पाहिजे. हलक्या प्रकरणांत सेल्फ-आयसोलेशन सुद्धा चांगले काम करते.