जर तुमच्या पत्रिकेत ‘शुक्र’ कमकुवत असेल तर, ‘या’ गोष्ट कायम लक्षात ठेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्योतिष शास्त्रात शुक्र ग्रहाला भौतिक सुखांचे कारक मानले जाते. ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत शुक्र ग्रह मजबूत स्थितीत असतो त्यांना सर्व प्रकारच्या सांसारिक सुख प्राप्त होते. परंतु जर पत्रिकेत शुक्र ग्रह कमकुवत असेल तर व्यक्तीच्या जीवनावर विपरित परिणाम होतो. पत्रिकेत शुक्र ग्रह कमकुवत असेल तर ज्योतिष शुक्राच्या दोषापासून वाचण्यासाठी अन्न ग्रहणासंबंधित काही नियम आहेत.

शुक्रवारी मीठाचा त्याग करा
शुक्रवार हा दिवस शुक्रचा दिवस मानला जातो. यादिवशी मीठ खाणे टाळा. मीठाचे जेवण करु नका. यामुळे तुमचा शुक्र ग्रह मजबूत होईल.

रात्री मिठाई खाणे टाळा
जर तुमच्या पत्रिकेत शुक्र कमकुवत असेल तर चुकूनही रात्री मिठाई खाऊ नका. काही लोक जेवन केल्यानंतर रात्री मिठाई खातात परंतु शुक्र त्यांच्यावर प्रभाव टाकतो.

रात्री जिलेबीचे सेवन टाळा
पत्रिकेत शुक्र ग्रह कमकुवत असेल तकर रात्री जिलेबीचे सेवन करु नका. परंतु तुम्ही सकाळी जिलेबीचे सेवन करतात तर त्याने तुमच्या शुक्र मजबूत होईल.

शुक्र देवाचा अशिर्वाद
आपल्या आहारात बदल करुन तुम्ही तुमच्या पत्रिकेतील शुक्र मजबूत करु शकतात. शुक्र ग्रहाची कृपेने तुमच्या प्रेम आणि वैवाहिक जीवन सुखी होईल. याबरोबर तुमच्याकडे संपत्तीचा अभाव राहणार नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/