Avoid These Things For Your Face | चेहऱ्यावर ‘या’ गोष्टी लावणे टाळा, नाहीतर तुमचा चेहरा होऊ शकतो कुरूप

पोलीसनामा ऑनलाइन टीम – धावपळीच्या काळात प्रत्येकजण आपल्या स्वप्नांच्या मागे धावत आहे. (Avoid These Things For Your Face) या सगळ्यामधून त्याला त्याच्या शरीराकडे लक्ष द्यायला देखील वेळ नसतो. मात्र असं जरी असलं तरी, काहीजण आपल्या शरीराची खूप व्यवस्थित काळजी घेताना आपल्याला दिसतात. (Avoid These Things For Your Face)

 

आता तर दिसण्याला जास्तच महत्व आलं आहे. त्यामुळे बरीच लोक आपलं सौंदर्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतो. यासाठी काही महागडे कॉस्मेटिक्स (Expensive Cosmetics) वापरतात. तर काही घरगुती उपाय (Home Remedies) करतात. परंतू त्यातील काही जणांना लावलेले प्रोडक्ट सूट होत नाहीत. त्यामुळे त्याचा त्यांच्या चेहऱ्यावर परिणाम झालेला दिसतो.(Avoid These Things For Your Face) तर अशाच समस्यांना तुम्हाला सामारं जाव लागू नये यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. त्यामध्ये तुम्ही चेहऱ्याला कोणत्या गोष्टी लावू नये याविषयी सांगणार आहोत.

 

1. बॉडी लोशन (Body Lotion) –
याच्या नावामध्येच त्याचा अर्थ आहे. अंगावर लावायचे लोशन. परंतू चेहरा हा देखील शरीराचा एक भाग आहे, असा विचार करून अनेकजण चेहऱ्यावरही बॉडी लोशन लावतात. पण तुम्ही चुकूनही अशी चूक करू नका. कारण बॉडी लोशन हे घट्ट असते आणि चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील छिद्र (Pores On The Face) बंद होतात. ज्यामुळे मुरुम आणि मुरुमांची समस्या (Acne Problem) उद्भवू शकते. याशिवाय चेहऱ्यावर बॉडी लोशन लावल्यानेही ॲलर्जी (Allergy) देखील होऊ शकते.

 

2. टूथपेस्ट (Toothpaste) –
अनेकांना मुरुमांची समस्या असते. मुरुम दूर करण्यासाठी चेहऱ्यावर टूथपेस्ट लावतात. परंतू टूथपेस्टमध्ये अनेक रसायने असतात आणि ती चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवर जळजळ होऊ शकते. डाग (Dark Spot) आणि सुरकुत्याची (Wrinkles) समस्या देखील असू शकते. तसेच त्वचा कोरडी (Dry Skin) होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे चेहऱ्यावर टूथपेस्ट लावण्याची चूक अजिबात करू नका.

3. गरम पाणी (Hot Water) –
चेहरा स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर आपण करतो. परंतू गरम पाणी चेहऱ्यावरील ओलावा हिरावून घेतो आणि चेहरा पूर्णपणे कोरडा आणि निस्तेज होतो.
त्यामुळे चेहरा गरम पाण्याने धुण्याऐवजी कोमट पाण्याने धुवा.

 

4. लिंबू (Lemon) –
लिंबूमध्ये विटॅमिन सीची (Vitamin C) मात्रा अधिक प्रमाणात असते. त्यामुळे अनेकजण लिंबू आपल्या शरीरावर लावतात.
पण लिंबू किंवा लिंबाचा रस (Lemon Juice) थेट त्वचेवर लावू नये.
विशेषत: जर तुमची त्वचा संवेदनशील (Sensitive Skin) असेल तर थेट चेहऱ्यावर लिंबू लावूच नये.
यामुळे त्वचेवर जळजळ किंवा खाज येऊ शकते.

 

5. साबण (Soap) –
अनेकजण आपल्या शरीराला लावणारा साबण आपल्या चेहऱ्यावर लावतात. पण चुकूनही चेहऱ्यावर आंघोळीचा साबण लावू नका.
कारण म्हणजे साबण त्वचेतील ओलावा काढून घेतो, त्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होते.
तसेच चेहऱ्याची पीएच पातळी (pH Level) बिघडते आणि साबणामुळे त्वचेची जळजळ देखील होऊ शकते.
त्यामुळे चेहऱ्यावर नेहमी फेसवॉशचा (Face wash) वापर करा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Avoid These Things For Your Face | do not apply anything on face toothpaste body lotion hot water lemon soap it may cause skin problems

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abhishek Bachchan News | आईच्या एका अटीमुळं अपूर्ण राहिलं अभिषेक बच्चनचं पहिलं प्रेम, जाणून घ्या काय होती ‘ती’ अट

 

Sunny Deol Affair News | ‘या’ प्रसिद्ध सुपरस्टारच्या पत्नीसोबत होतं सनी देओलचं अफेअर

 

Causes And Prevention Of Snoring | घोरण्याच्या समस्येने त्रस्त आहात का?, ‘या’ सोप्या उपायांनी होईल घोरणे कमी