Pregnancy मध्ये चुकूनही खाऊ नका ‘ही’ 3 फळं, वाढतो मिसकॅरेजचा धोका !

नवी दिल्ली : महिलांना प्रेग्नंसी दरम्यान आहाराची खुप काळजी घ्यावी लागते. तरच गर्भात वाढत असलेल्या भ्रूणाला निरोगी पद्धतीने विकसित होण्यासाठी आवश्यक पोषकतत्व मिळतात. जर भ्रूणाचा विकास योग्यपद्धतीने झाला नाही तर प्रेग्नंसीमध्ये अनेक गुंतागुंत निर्माण होतात. काही फळे अशी आहेत ज्यांचे सेवन गरोदर महिलांनी चुकूनही करू नये, अन्यथा ब्लिडिंग सुरू होऊ शकते आणि गंभीर प्रकरणात मिसकॅरेज होऊ शकते. ही फळे कोणती ते जाणून घेवूयात…

प्रेग्नंसीमध्ये खाऊ नका ही फळे

1. पपई –
गरोदर महिलेने पपई अजिबात सेवन करू नये, विशेषकरून बच्चा पपई. यामध्ये लेटेक्स असते ज्यामुळे गर्भाशयात आकुंचन वाढते जे गर्भातील बाळासाठी धोकादायक ठरते.

2. अननस –
गरोदर महिलांनी अननस सुद्धा खाऊ नये. यामध्ये काही एन्जाइम्स आढळतात जे सर्विक्सच्या टेक्सचरमध्ये बदल करतात, ज्यामुळे वेळेपूर्वी आकुंचन सुरू होते. यामुळे मिसकॅरेज होऊ शकते. शिवाय डायरिया सुद्धा होऊ शकतो.

3. द्राक्ष –
द्राक्षात असे कोणतेही कंपाऊंड आढळत नाही जे माता आणि बाळाला नुकसानकारक आहे, परंतु प्रेग्नंसीच्या तिसर्‍या तिमाहीत म्हणजे 6 ते 9 महिन्याच्या दरम्यान द्राक्ष सेवन करू नये. कारण द्राक्ष शरीरात गरमी निर्माण करतात गरोदर महिला आणि तिच्या बाळासाठी हे ठिक नसते. म्हणून कोणत्याही गुंतागुंतीपासून दूर राहण्यासाठी द्राक्षाचे सेवन करू नये.