ब्रेकफास्ट टाळल्याने वाढतो मधुमेह होण्याचा धोका !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ब्रेकफास्ट टाळल्याने टाईप-२ मधुमेह होण्याचा धोका वाढत असल्याचं जर्मनीतल्या संशोधकांना दिसून आलं आहे. द जर्नल न्यूट्रिशनमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. रात्रभर काहीही न खाल्ल्यानं पोट आठ-दहा तास उपाशी असतं. अशावेळी शरीरात अधिक प्रमाणात ग्लुकोज तयार होतं. शरीरात जर सातत्याने जास्त प्रमाणात ग्लुकोजची निर्मिती होत असेल तर पुढे मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका संभवतो. त्यामुळे दीर्घकाळ उपाशी राहणं टाळलं पाहिजे.

नव्वद हजाराहून अधिक व्यक्तींच्या आरोग्याचा अभ्यास जर्मनीतल्या संशोधकांनी केला. त्यापैकी चार हजार नऊशे पस्तीस जणांना मधुमेह झाला. संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार आठवड्यातील एक दिवस ब्रेकफास्ट न केल्यास  टाईप-२ मधुमेहाचा धोका सहा टक्क्यांनी वाढतो. आठवड्यातील चार ते पाच दिवस ब्रेकफास्ट न केल्यास हा धोका पंचावन्न टक्क्यांपर्यंत वाढतो. ब्रेकफास्ट करणाऱ्यांच्या तुलनेत ब्रेकफास्ट न करणाऱ्या व्यक्तींना टाईप २ मधुमेह बळावण्याची शक्यता तेहतिस टक्क्यांनी वाढते. ज्या व्यक्ती ब्रेकफास्ट करत नाहीत त्यांना टाईप २ मधुमेह बळावण्यास बॉडी मास्क इंडेक्स अंशत: कारणीभूत ठरत असल्याचं दिसून आलं आहे. बॉडी मास्क इंडेक्स म्हणजे शरीराचं वजन आणि उंचीनुसार शरीरातील फॅटचं प्रमाण. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या मते बीएमआय तीसपेक्षा जास्त असल्यानं तो व्यक्ती लठ्ठ असतो.

संशोधनात सहभागी व्यक्तींचं बॉडी मास्क इंडेक्स लक्षात घेतलं तरी ब्रेकफास्ट न केल्यानं मधुमेहाचा धोका आहेच. मात्र सर्वसामान्य व्यक्तींच्या तुलनेत लठ्ठ व्यक्तींमध्ये याचं प्रमाण जास्त दिसून आलं आहे. सर्वसामान्य वजन असलेल्या व्यक्तींच्या तुलनेत लठ्ठ व्यक्ती ब्रेकफास्ट करणं टाळतात. त्यामुळे त्यांना मधुमेह होण्याचा धोका जास्त वाढतो.

ह्याही बातम्या वाचा –

पुण्यात चाकूने सपासप वार करुन महिलेचा खून 

शिवसेनेच्या ‘त्या’ नगरसेवकाला अटक