तुम्हाला, देशात आणखी एकदा महाभारत घडवायचंय का ? MIM चे औवेसी रजनीकांतवर भडकले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्यंकय्या नायडू यांच्या एका पुस्तकाच्या उद्घाटन प्रसंगी अमित शहा आणि अभिनेते रजनीकांत एकाच व्यासपीठावरती एकत्र आले होते. यावेळी रजनीकांत यांनी गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चांगलाच कौतुक केलं होत. ३७० कलम काश्मीर मधून रद्द केल्यानंतर सर्वत्र आनंदाचे वातावरण होते, सरकारने उचललेल्या निर्णयावर खुश होऊन रजनीकांत यांनी मोदी शहा जोडीचे वर्णन ‘कृष्ण-अर्जुन’ अशा शब्दात केले होते.

रजनीकांत यांनी केलेले मोदी शहांचे कौतुक MIM चे खासदार असुदुद्दीन औवेसीं यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसतंय त्यामुळे औवेसीं यांनी रजनीकांत याना प्रश्न केला आहे. ओवेसी म्हणतात शहा-मोदी, कृष्ण-अजुर्न असतील तर या परिस्थितीत कोण पांडव आणि कोण कौरव ? तसेच तुम्हाला, देशात आणखी एकदा महाभारत घडवायचंय का ? असा प्रश्नही औवेसींनी रजनीकांत यांना विचारला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like