जेजुरी येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – जेजुरी विद्यानगर येथील मानव विकास प्रतिष्ठान संचलित श्री दत्त मित्र मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शेती आणि शेतकरी यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर 30 वर्षापासून लढा देणारे भारतीय किसान संघाचे प्रदेशाध्यक्ष माऊली तुपे यांना ज्येष्ठ समाजसेवक, गडचिरोली येथे पोलिस सेवा बजावत असताना दोन वेळा राष्ट्रपती शौर्य पुरस्कार अंकुश माने यांना मिळाला. पुरंदरच्या दुष्काळ भागात जनावरांच्यासाठी चारा लावणी जलसंवर्धन व दोन हजार वृक्ष लावणारे शंभूसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते सागर जगताप यांना समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच बबन चित्रपट अभिनेत्री गायत्री जाधवला यंदाचा कलाभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

या प्रसंगी जेजुरीतील डॉ. प्रसाद खंडागळे, मा.लोकेश सावंत, अभीदादा काकडे, संतोष पांढरे तसेच जेजुरीचे गटनेते सचिन सोनवणे, नीरा मार्केट समितीचे संचालक ॲड. धनंजय भोईटे, जेजुरी शहर शिवसेनाप्रमुख विठ्ठल सोनवणे, पुरंदर तालुका सरपंच संघाचे अध्यक्ष राजेंद्र भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

मंडळाचे पदाधिकारी अजय पठाण, अजय देवकर दिलीप सुतार,आकाश शेवाळे, नीरज गायकवाड, अमोल गायकवाड यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले, सूत्रसंचालन अजय देवकर यांनी केले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like