‘शौर्य’ गाजवणाऱ्या जवानांना देण्यात येतात ‘हे’ पुरस्कार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय सैन्याकडून बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक करणाऱ्या पाच वैमानिकांना वायू सेनेकडून पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनी त्यांना हे पदक देण्यात येणार आहे. यात विंग कमांडर अमित रंजन, स्क्वॉर्डन लीडर राहूल बसोया, पंकज भुजडे, बीकेएन रेड्डी, शशांक सिंह यांच्या समावेश आहे. यांना वायु सेनेकडून वीरपदक देण्यात येणार आहेत.

या शिवाय बालाकोटमध्ये दहशतवादी संघटनाचे तळ नेस्तनाबूत करण्याऱ्या भारतीय वायु सेनेचे स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांना देखील युद्ध सेवा पदक देऊन सन्मानित करण्यात येईल. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. यासारखी सैन्याकडून देण्यात येणारी इतर पदक आहेत, जी शौर्य प्रदर्शन केल्यास देण्यात येतात.

परमवीर चक्र
परमवीर चक्र सेनेमध्ये देण्यात येणारा सर्वात मोठा वीरता पुरस्कार आहे. हे पुरस्कार त्यांना सैनिकांना देण्यात येतो, ज्यांनी धैर्याने शत्रूला तोंड दिले, वीर बलिदान देऊन साहसी कार्य केले. हे चक्र युद्ध काळात साहसी प्रदर्शन दाखवल्याबद्दल देण्यात येताे. परमवीर चक्र कांस्यापासून बनवण्यात आलेले असते आणि त्याचा आकार गोल असतो. यावर इंद्रच्या वज्रच्या चार प्रतिकृति असतात. हे पदक जांभळ्या रंगाच्या रिबिनीबरोबर देण्यात येते.

महावीर चक्र
वीरता दाखवल्याबद्दल हा दुसरा सन्मान मानन्यात येते. शत्रू समोर हवा, पाणी आणि जमिनीवर असाधारण वीरतेचे प्रदर्शन दाखवणाऱ्या सैनिकांना महावीरचक्राने सन्मानित करण्यात येते. हे चक्र युद्धाच्या वेळी असाधारण शौर्य दाखवल्यास आणि बलिदान झालेल्या सैनिकांना देण्यात येते. परमवीर चक्रानंतर शौर्य दाखवल्याबद्दल देण्यात येणाऱ्या पुरस्कारापैकी हा दुसरा सर्वोच्च सन्मान आहे. हे पदक सिल्वर धातू आणि गोलाकर असते. हे मेडल पांढऱ्या आणि नारंगी रंगाच्या रिबिनमध्ये देण्यात येते. यावर पाच कोन असलेला तारा असतो.

वीर चक्र
युद्ध प्रसंगी शत्रूला धूळ चारणाऱ्यांना आणि अभूतपूर्व शौर्य दाखवणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. युद्ध काळात शौर्य दाखवणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार सिल्वर मेडलपासून बनवलेला असतो. यात पाच कोन असलेला तारा असतो. हे मेडल निळ्या आणि नारंगी रंगाच्या रिबिनमध्ये देण्यात येतो.

अशोक चक्र
शांततेच्या काळात शौर्य दाखणाऱ्या सैनिकांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. हे चक्र राष्ट्रपती द्वारा देण्यात येते. पहिल्यांदा याला अशोक चक्र क्लास वन म्हणण्यात येत होते.

किर्ती चक्र
शौर्य आणि वीरता दाखवल्यास किर्ती चक्र पुरस्कार देण्यात येतो. हा शांती काळात देण्यात येणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार मरणोत्तर देखील देण्यात येतो. हा पुरस्कार चांदीपासून गोलाकार बनवण्यात आलेला असतो.

शौर्य चक्र
किर्ती चक्र आणि शौर्य चक्र, अशोक चक्राचेच दोन वर्ग आहेत शांततेच्या वेळी वीर प्रदर्शन दाखवल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. याचे मेडल कांस्य धातूचे असते.

आरोग्यविषयक वृत्त –