Awards To Photographers Maharashtra | महाराष्ट्राच्या 3 छायाचित्रकारांना पुरस्कार; आठ वे राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : Awards To Photographers Maharashtra | उत्कृष्ट छायाचित्रणासाठी महाराष्ट्रातील तीन छायाचित्रकारांना राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्काराने केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. (Awards To Photographers Maharashtra)

येथील राष्ट्रीय माध्यम केंद्रात मंगळवारी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने आठव्या राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कारांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र, परिक्षक मंडळाचे अध्यक्ष विजय क्रांती उपस्थित होते. कार्यक्रमात वेगवेगळया श्रेणीतील उत्कृष्ट छायाचित्रणांसाठी 13 छायाचित्रकांराना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील तीन छायाचित्रकारांचा समावेश आहे. कार्यक्रमस्थळी केंद्रीय राज्य मंत्र्यांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. (Awards To Photographers Maharashtra)

व्यावसायिक छायाचित्रकार श्रेणीतील ‘विशेष उल्लेख’ हा पुरस्कार पुण्यातील दिपज्योती बनिक आणि उमेश निकम यांना प्रदान करण्यात आला. तर, सर्वोत्कृष्ट हौशी (अमॅच्योर) छायाचित्रकार या श्रेणीतील वार्षिक पुरस्कार मुंबईचे अरुण साहा यांना प्रदान करण्यात आला.

ख्यातनाम छायाचित्रकार सिप्रा दास यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट व्यावसायिक छायाचित्रकार श्रेणीतील पुरस्कार ससी कुमार रामचंद्रन यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यावसायिक आणि हौशी (अमॅच्योर) श्रेणीतील प्रत्येकी सहा पुरस्कारांसह एकूण तेरा पुरस्कार प्रदान करण्यात आले. व्यावसायिक श्रेणीसाठी “जीवन आणि पाणी” हा विषय होता तर “भारताचा सांस्कृतिक वारसा” हा विषय हौशी श्रेणीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जीवनगौरव पुरस्कारासाठी एकूण 9 प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या.
व्यावसायिक छायाचित्रकार श्रेणीसाठी एकूण 4,535 छायाचित्रांचा समावेश असलेल्या 462 प्रवेशिका प्राप्त झाल्या.
या प्रवेशिका 21 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमधून प्राप्त झाल्या होत्या.
हौशी छायाचित्रकार श्रेणीमध्ये 24 राज्ये आणि 6 केंद्रशास‍ित प्रदेशांमधून 6,838 छायाचित्रांचा समावेश
असलेल्या 874 प्रवेशिका प्राप्त झाल्या असल्याची माहिती परिक्षक मंडळाचे अध्यक्ष विजय क्रांती यांनी
कार्यक्रमात दिली. जीवनगौरव पारितोषिकांचे स्वरूप 3,00,000 रूपये रोख आणि मानचिन्ह असे आहे.
व्यावसायिक आणि हौशी या दोन्ही श्रेण‍ींमध्ये अनुक्रमे. 50,000/- आणि 30,000/- रुपयांच्या रोख पुरस्कार आणि मानचिन्ह असे प्रदान करण्यात आले.

Web Title : Awards To Photographers Maharashtra | Awards to 3 photographers from Maharashtra; 8th National Photography Awards

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कोयत्याने प्राणघातक हल्ला करुन फरार झालेल्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Devendra Fadnavis | म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीस पूर्वीप्रमाणेच सेवा शुल्क आकारण्यात येणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

Pune PMC Property Tax | मिळकतकर सवलतीसाठी पुढील आठवड्यात बैठक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन