आरोग्य विभागाच्या वतिने प्राथामिक शाळांमध्ये जनजागृती मोहिम

अकोलाः पोलीसनामा आॅनलाईन-

सद्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विविध प्रकारचे आजार वाढण्याची शक्यता असते. यामध्ये हिवताप, डेंग्यू व जलजन्य आजाराचा प्रामुख्याने समावेश असतो. यावर प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून अारोग्य विभागाच्या वतीने 5 ते 12 वी पर्यंतच्या शाळांमध्ये आरोग्य शिक्षण व शारिरीक स्वच्छते बद्दलची माहिती देऊन विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी जनजागृतीची मोहिम हाती घेण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B01LXHKR4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’552df6a8-9d45-11e8-806d-8b4adc2a9da7′]

अकोला जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र हातरुण ने स्व नर्मदा बनारसीलाल अग्रवाल आश्रम शाळा व महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे शालेय डेंग्यू जनजागृती कार्यक्रम व जंतनाशक मोहीम सामूहिकरीत्या घेण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डाॅ. एस. के गिरी यांनी डेंग्यू, हिवताप, चिकणगुनिया, जलजन्य आजाराचे लक्षण व उपचाराबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी बोलतांना त्यांनी वैयक्तीक स्वच्छता व परिसरातील स्वच्छता ठेवल्यास विद्यार्थ्यांचे जिवनमान उंचावेल व निरोगी समाज निर्माण होण्यास विद्यार्थी हातभार लावतात. तसेच अनेक आजारापासून दूर राहतात.

या प्रसंगी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी एस. एस. डोंगरे यांनी स्लाईड शो च्या माध्यामातून विद्यार्थ्यांना डेंग्यू व मलेरिया या आजाराची प्रतिबंधात्मक उपायोजनांची सविस्तर माहिती दिली. डासउत्पत्ती स्थान निर्माण होऊ नये यासाठी परिसरातील पाणी साचू न देता ती वाहती करावीत तसेच टायक, कूलर नारळाचे करवंटी, फुलदाणी यामध्ये पाणी साठू नये अशा पद्धतीने ठेवावे. घरातील ड्रम, रांजण हौद पाणी साठे व्यवस्तीत झाकून किंवा कापडाने घट्ट बांधून ठेवल्यास त्यात डास अंडी घालू शकत नसल्याचे आढळून येते. हिवताप व डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळवायचे असेल तर एडिस व एनाफिलीस डास उत्तपती रोखणे हाच एकमेव उपाय आहे.  तसेच एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.
[amazon_link asins=’B00RM1EC1S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5b2585da-9d45-11e8-8fa9-b9e9ad6f6b8c’]

एस डी गावंडे (HV) यांनी हाथ धुण्याच्या पद्धती व त्याचे फायदे यावर प्रकाश टाकला. या प्रसंगी  एच आर कानपुरे,  श्रीमती ढेंगे  तसेच मुख्याध्यापक व शिक्षकवृंदानी मोलाचं सहकार्य केले.