Pune News : समाजहिताची जाण हेच खरे समाधान – अ‍ॅड. जगताप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  समाजासाठी आपण काही देणे लागतो, त्यांना केलेली प्रामाणिक मदत आपल्याला एक प्रकारे आत्मिक समाधान मिळवून देते. स्वतःच्या मुलांचा हट्ट पुरवताना जेव्हा आपण अनाथ मुलांच्या अपेक्षांचे ओझे पेलतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्यातील माणूस जागा होतो, या अनोख्या माणुसकीचा प्रत्यय जेव्हा जनहित फौंडेशन या सामाजिक संस्थेने अनाथ मुलांना खाऊ देत नव वर्षीच्या सुरूवातीसच या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम केल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. दिलीप जगताप ( Adv. Dilip Jagtap) यांनी सांगितले.

भिलारेवाडी येथील जनसेवा फौंडेशनमधील अनाथ मुलांना अ‍ॅड. दिलीप जगताप यांच्या वतीने नव वर्षानिमित्त खाऊ वाटप करण्यात आला. याप्रसंगी सचिन कोळी, पांडुरंग मरगजे, धनराज गरड यादी मान्यवर उपस्थित होते.

जगताप म्हणाले की, लहान मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्य जगातील सर्वात सुखाची कल्पना देऊन गेले. चार वर्षाच्या मुलांनी केलेले अनोख्या ढंगातील स्वागताने तर मन हेलावून गेले. माणुसकीची अनुभूती देणारा हा उपक्रम व नव वर्षाची सुरुवात सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्याची फाउंडेशनची परंपरा कायम राखली आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच समाजकारणाचे शिक्षण विद्यार्थ्यांना शाळेतच मिळाल्यास सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळी निर्माण होऊ शकेल आणि वंचित व अनाथ मुलांचा संभाळ करणाऱ्या संस्थांच्या अडचणही दूर होऊ शकतील असे त्यांनी स्पष्ट केले.