भयंकर! इअरफोन लावून रेल्वे रूळ ओलांडणे बेतले जीवावर

पोलिसनामा ऑनलाईन – बुरहानपूर जिल्ह्यात कानात इअरफोन लावून रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या दोघांना रेल्वेने चिरडल्याची घटना घडली. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता घडली हा अपघात इतका भीषण होता कि दोघांच्याही शरीराचे ५० पेक्षा जास्त तुकडे झाले आहेत.

बुरखुरपूर येथील बिरोदा येथील रहिवासी असलेले १९ वर्षीय इरफान आणि १६ वर्षीय कलीम हे ट्रॅकवरून बुरहानपूरकडे येत होते. काही वेळातच कर्नाटक एक्स्प्रेस भुसावळहून लालबाग रेल्वे स्थानकाकडे येत होती. रेल्वे ट्रॅकच्या पोल क्रमांक ४९६/२ ते ४९६/४ दरम्यान दोघेही जलद गतीने येणाऱ्या रेल्वेखाली सापडल्याने त्यांचा. दरम्यान लालबाग रेल्वे स्थानक गाठताच कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने अधिकाऱ्यांना अपघाताची माहिती दिली.

दोन्ही मुले रुळावरून चालत आहेत. हॉर्न वाजवल्यानंतरही तो रुळावरुन बाजूला झाले नाही, यामुळे दोघेही रेल्वेखाली सापडले असे रेल्वेच्या चालकाने सांगितले.

माहिती मिळताच रेल्वे व पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ही माहिती समजताच मृतांची ओळख पटविण्यासाठी गावकरी ट्रकजवळ पोहोचले. मात्र, ग्रामस्थ व पोलीस यांना केवळ दोन धड सापडले. ट्रेनच्या धडकेमुळे शरीराचे बरेच तुकडे झाले, छिन्नविछिन्न झालेल्या शरीरामुळे चेहरा ओळखणेही कठीण झाले. पोलिसांसह सुमारे ४० जणांनी मृतांचे मृतदेह शोधण्यासाठी दोन तास ट्रॅकवर घालवले.

दरम्यान, गोदानसह तीन गाड्या वाघोडा येथे अर्धा तास थांबल्या होत्या. वाहतुकीवर परिणाम झाल्याची माहिती मिळाल्यानंतर लोकांना ट्रॅक वरून बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आले.

कलीम हा इयत्ता १२ वीचा विद्यार्थी होता आणि इरफान मजूर म्हणून काम करत होता. गावकऱ्यांच्या मते, बहुतेक लोक शौचासाठी रुळावरुन जातात. बहुधा कलीम आणि इरफानसुद्धा शौचास गेले असतील. रात्री उशिरा पोलीस मृतदेहांचे सापडलेले तुकडे घेऊन जिल्हा रुग्णालयात पोहोचले.