नोकरीची सुवर्णसंधी ! ‘ही’ बँक करणार 1000 कर्मचार्‍यांची Hiring, जाणून घ्या कसा मिळेल Job

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेने पुढच्या एका वर्षात 1000 लोकांना नोकरी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘गिग-अ-ऑपरच्यूनिटीज’ हा उपक्रम सुरू केला आहे. या मॉडेल अंतर्गत कोणताही प्रतिभावान उमेदवार देशातील कोणत्याही भागातील बँकेत काम करु शकतो. बँकेच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.

मॉडेलमध्ये काम करण्याचे असतील दोन मार्ग
हे मॉडेल दोन पद्धतींनी काम करेल – प्रथम पूर्ण-वेळेची कायमची नोकरी आणि दुसरे प्रकल्पानुसार विशिष्ट कालावधीपर्यंत मर्यादित. अ‍ॅक्सिस बँकेचे कार्यकारी संचालक (कॉर्पोरेट सेंटर) राजेश दहिया यांनी सांगितले की, आम्हाला वाटते की, गिग्समध्ये मोठ्या (नियमित) नोकर्‍या मिळतील. आम्हाला सामान्य नोकरीप्रमाणे प्रभावी बनवायचे आहे. पुढील एका वर्षात आम्ही या मॉडेलद्वारे 800-1,000 लोक जोडले जातील आणि मी हे किमान सांगत आहे.

ते म्हणाले, आधी मानसिकता अशी होती की, आपल्याला ऑफिसमध्ये कामावर यावे लागेल, परंतु आता घरून काम करण्याच्या संकल्पनेने बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. दहिया म्हणाले की, लोक घरून काम करण्यासाठी यापूर्वी मागेपुढे पाहत असत, परंतु आता त्यांना याची सवय झाली आहे आणि ती खूप उपयुक्त असल्याचे सिद्ध होत आहे. ते म्हणाले की, देशभरातील तरुण, अनुभवी मध्यम पातळीवरील व्यावसायिक आणि महिलांसह बँक चांगली प्रतिभा शोधेल.