ठाकरे सरकारचा फडणवीसांना ‘मोठा’ धक्का ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना-भाजपमध्ये फूट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. अमृता फडणवीस यांच्या ट्विटला शिवसेनेने त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, आता ठाकरे सरकार अमृता फडणवीस यांना ‘अ‍ॅक्सिस’ धक्का देण्याच्या तयारी आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांची अ‍ॅक्सिस बँकेतील खाती राष्ट्रीयकृत बँकांमध्ये वळती करण्याचा निर्णय लवकरच ठाकरे सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. अ‍ॅक्सिस बँकेत 2 लाख पोलीस कर्मचाऱ्यांची खाती आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलिसांची खाती अ‍ॅक्सिस बँकेत वळवण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस अ‍ॅक्सिक बँकेत वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारनं पोलिसांची खाती वळती करण्याचा निर्णय घेतल्यास अमृता फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्का असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून ठाकरे आणि ठाकरे सरकारवर टीका केल्याच्या पर्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांची खाती पुन्हा एकदा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये वळती करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तारानंतर घेतला जाऊ शकतो, असे वृत्त मुंबईतील एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. सध्या दोन लाख पोलिसांची खाती अ‍ॅक्सिस बँकेत आहेत. या खात्यांमध्ये वेतनाच्या स्वरुपात जवळपास वर्षाकाठी 11 कोटी रुपये जमा होतात. मात्र, लवकरच राज्य सरकार ही खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळती करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. याचा मोठा फटका अ‍ॅक्सिस बँकेला बसणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/