‘विहिंप’ काढणार प्रभू श्रीरामाची ‘मिरवणूक’, PM मोदी – CM योगी सामील होणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या विवाहाची तयारी विश्व हिंदू परिषद करत आहे. अयोध्या विवादावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा पहिला सार्वजनिक कार्यक्रम असेल. विश्व हिंदू परिषदकडून दर 5 वर्षांनी अयोध्येपासून नेपाळच्या जनकपूरपर्यंत प्रभू रामाची वरात काढण्यात येते. विहिंप यंदा देखील याच तयारीला लागले आहे. 21 नोव्हेंबरला अयोध्येच्या कारसेवकपूरमपासून प्रभू रामाची वरात जनकपूरला रवाना होईल. या कार्यक्रमाचे निमंत्रण पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवण्यात आले आहे.

1 डिसेंबर आहे लग्नाचा मुहूर्त –
विहिंपच्या मते मुख्यमंत्री या कार्यक्रमामध्ये सहभाग घेईल. तसेच पंतप्रधान देखील जनपकपूरमध्ये रामाच्या विवाहाला पोहण्याची शक्यता आहे. अयोध्या प्रकरणाचा निर्णय आल्यानंतर हा पहिला सार्वजनिक कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम भव्यदिव्य करण्यासाठी विहिंप प्रयत्न करत आहे. 1 डिसेंबर लग्नाचा मुहूर्त आहे. ज्यासाठी अयोध्या मंदिरात तयारी सुरु करण्यात आली आहे. 21 नोव्हेंबरला रामची वरात अयोध्येतून निघेल. ज्याला न्यासाचे अध्यक्ष हिरवा कंदील दाखवतील. त्यात जवळपास 200 संत सहभागी असतील. तसेच इतर अनेक प्रमुख व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होतील.

पीएम सीएम होतील सहभागी –
विहिंपच्या प्रांतीय मिडिया प्रभारी शरद शर्मा यांनी सांगितले की 21 नोव्हेंबरला अयोध्येतून निघेल आमि 28 नोव्हेंबरला जनकपूरला पोहचेल. 1 डिसेंबरला माता सीता प्रभू रामांच्या परिणय सूत्रात बांधल्या जातील. त्यानंतर वरात अयोध्येत परत येईल. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य देखील सहभागी होतील. सर्वांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे आणि अपेक्षा आहे की अयोध्या आणि जनकपूरच्या दोन्ही कार्यक्रमात मुख्यमंंत्री योगी उपस्थित राहतील. तसेच पंतप्रधान देखील जनकपूरच्या कार्यक्रमात उपस्थित राहू शकतात.

Visit : Policenama.com