अयोध्या निर्णयापुर्वीच सुप्रीम कोर्टानं UP च्या DGP आणि मुख्य सचिवांना ‘बोलावलं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्या प्रकरणी लवकरच सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे. यासाठी सुप्रीम कोर्टाने उत्तरप्रदेशचे पोलीस महासंचालक ओपी सिंह आणि मुख्य सचिव आरके तिवारी यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आज दोघांनाही दुपारी 12 वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून निकालाआधी दोघांकडे कोर्ट सुरक्षेसंबंधी माहिती घेणार आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले सक्तीचे आदेश –

गुरुवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सक्त आदेश दिले असून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सोशल मीडियावर भडकावू संदेश पाठवणाऱ्यांवर देखील कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे देखील आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

अराजकता पसरवणाऱ्यांवर कारवाईचे आदेश –

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कंट्रोल रूम चोवीस तास सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून पोलीस गस्त वाढवण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. 112 या हेल्पलाईन क्रमांकावरून नागरिकांना सतत मदत करण्याकडे लक्ष देण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. समाजकंटकावर कडक कारवाई करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत. प्रमुख अधिकाऱ्यांना रात्रभर गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले असून जिल्ह्यात सगळीकडे लक्ष देण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. त्याचबरोबर सर्व धर्मगुरूंना शांततेचे आवाहन करण्यात करण्यात आले असून अयोध्या आणि लखनौमध्ये हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली आहे.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके