अयोध्या : हनुमान जयंती निमित्तानं जारी करण्यात आला श्रीराम जन्मभूमि क्षेत्र ट्रस्टचा ‘लोगो’, ‘हे’ आहे वैशिष्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हनुमान जयंतीच्या निमित्त राम मंदिर निर्माणासाठी गठीत श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचा लोगो सादर करण्यात आला आहे. यात सूर्यवंशी प्रभु श्रीरामसह असणारे संकटमोचक हनुमान देखील या लोगोमध्ये दाखवण्यात आले आहेत.

या चिन्हावर श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र लिहिण्यात आले आहे. या सह चिन्हाच्या दोन्ही बाजूला हनुमान नमन मुद्रेत विराजमान आहेत. तर आधार पट्टीवर रामो विग्रहवान धर्म असे लिहिण्यात आले आहे. या लोगोमध्ये प्रभु रामाची प्रतिमा अभयदान देण्याऱ्या मुद्रेत आहे. एवढेच नाही तर या लोगोमध्ये लाल, पिवळ्या आणि भगव्या रंगाचा वापर करण्यात आला आहे.

लोगो सादर करण्यात आल्यानंतर श्री रामजन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आतापासून कोणत्याही प्रकारचा पत्राचार करायचा झाल्या किंवा काही छापायचे झाल्यास त्यावर या लोगोचा वापर करेल. ट्रस्टची ओळख म्हणून लेटर हेड आणि इतर कागदांवर हाच लोगो छापण्यात येईल.

राम जन्म भूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने देखील कोरोनाशी लढण्यासाठी 11 लाख रुपयांचा चेक डीएम अनुज कुमार झा यांच्याकडे सोपवण्यात आला. ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनी सांगितले की ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्र आणि विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र यांनी सहाय्यता रक्कमेचा चेक डीएम यांच्याकडे सोपावला. ट्रस्टचे महासचिव म्हणाले कोरोना सारखी जगव्यापी महामारीशी लढण्यासाठी सर्व प्रकारच्या मदतीसाठी तयार राहिले पाहिजे.