बाबरी विध्वंस प्रकरणाचा निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना योगी सरकारने बनवले उपलोकायुक्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   अयोध्या येथील बाबरी मशिद विध्वंस प्रकरणावर निकाल देणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) विशेष न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस. के. यादव यांना उत्तर प्रदेश सरकारने उपलोकायुक्त बनवले आहे. लोकायुक्त न्यायाधीश संजय मिश्रा यांनी सुरेंद्र यादव यांना लखनौ येथील लोकायुक्त भवन येथे पदाची शपथ दिली.

सीबीआयचे सेवानिवृत्त न्यायाधीश सुरेंद्र यादव यांनी 6 डिसेंबर 1992 मध्ये अयोध्या येथे झालेल्या बाबरी मशिद विध्वंस प्रकरणावर सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुनावणी केली होती. या निकालात न्यायाधीश यादव यांनी या प्रकरणाशी संबंधित माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी, माजी केंद्रीयमंत्री मुरली मनोहर जोशी, मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांच्यासह सर्व 32 आरोपींना निर्दोषमुक्त केले होते.

तसेच विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांच्याविरोधात कोणताही साक्षीदार मिळाला नाही. बाबरी विध्वंस प्रकरणी निकाल देताना त्यांनी म्हटले, की फोटो, व्हिडिओ, फोटोकॉपी यांसारखी पुरावे देण्यात आले आहेत. मात्र, त्यातून काहीही सिद्ध होत नाही. त्यानंतर या सर्वांना निर्दोषमुक्त केले होते.

आता उपलोकायुक्तपदी निवड

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने न्यायाधीश सुरेंद्र के. यादव यांची राज्याचे उपलोकायुक्तपदी निवड केली आहे. तसेच त्यांना या पदाची शपथही देण्यात आली आहे.