अयोध्या प्रकरण : आम्ही रामाचे ‘वंशज’, जयपुरच्या राज घराण्याने केला ‘दावा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात दररोज सुनावणी होत असताना जयपूरच्या राजघराण्यातील एका सदस्याने केलेल्या दाव्यामुळे सगळे हैराण झाले आहेत. ज्यावेळी कोर्टात, प्रभू श्रीरामांचे कुणी वंशज आहेत का असे विचारण्यात आल्यानंतर जयपूर राजघराण्याच्या राजकुमारी आणि भाजपच्या खासदार दिया कुमारी यांनी ट्विट करत म्हटले कि, एकमात्र जयपूर घराणे प्रभू श्रीरामांचे ३०९ वे वंशज आहेत.

आमचे कुटुंब हे त्यांचा मुलगा कुश याचे वंशज आहेत, असंदेखील त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले होते. याआधी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीत देखील जयपूरच्या माजी राजकुमारी पद्मिनी देवी यांनी देखील आम्ही श्रीरामाचे वंशज असल्याचे म्हटले होते. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले कि, जयपूरचे माजी राजे आणि त्यांचे पती भवानी सिंह कुश हे श्रीरामांच्या ३०९ व्या पिढीचे आहेत.  त्यांनी या प्रकरणी एक पुरावा देखील सादर केला असून यामध्ये श्रीरामांच्या वंशजांची नवे लिहिण्यात आली असून सवाई जंगसिंह हे २८९ वे वंशज तर महाराजा भवानी सिंह हे ३०७ वे वंशज दाखवण्यात आले आहेत. जयपूर राजघराण्याच्या माजी राजकुमारी पद्मिनी देवी यांनी राममंदिराच्या मुद्द्याबाबत बोलताना म्हटले कि, या मुद्यावर लवकरात लवकर निकाल लागायला हवा. कोर्टाने विचारल्यामुळे आम्ही समोर आलो आहोत, अन्यथा आम्हाला यामध्ये काहीही राजकारण करायचे नाही. हा मुद्दा सर्वांच्या आस्थेचा प्रश्न असल्यामुळे तात्काळ यावर निर्णय व्हावा.

दरम्यान, प्रोफेसर आर नाथ यांनी या प्रकरणात सापडलेल्या कागदपत्रांमध्ये स्पष्टपणे या जागेवर राम मंदिर उभे असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर या जागेचा आणि मशिदीचा काहीही संबंध नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर राजघराण्याच्या जवळ वंशज असल्याविषयीची सर्व कागदपत्रे असून त्यांनी राजघराण्याच्या वतीने हि सर्व कागदपत्रे हायकोर्टाकडे आणि माजी मंत्री अरुण जेटली यांना पाठवली देखील होती.

आरोग्यविषयक वृत्त