अयोध्या केस : जिथं पहिलं मंदिर आहे तिथं देखील मशिद बनवली जाऊ शकते, मुस्लिम पक्षानं सुप्रीम कोर्टात सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सर्वोच्च न्यायालयात रामजन्मभूमी – बाबरी मशिदची रोज सुनवाणी करण्यात येत आहे आणि हा 34 वा दिवस आहे. शुक्रवारी 27 सप्टेंबरला मुस्लिम पक्षाने आपली बाजू मांडली. आज मुस्लिम पक्षाने आपली बाजू मांडली यानंतर हिंदू पक्षाने देखील आपली प्रतिक्रिया दिली. यानंतर न्यायलायाने सुुनावणी सुरु केली. हिंदू पक्षाने मत मांडण्यास सुरु करण्याआधी मुस्लिम पक्षाकडून शेखर नफाडे यांनी न्यायालयात बाजू मांडली, आता निजम पाशा आपली बाजू मांडत आहे.

सोमवारी झालेली सुनावणी –

01.12 – अयोध्या सुनावणी दरम्यान रामलला विराजमानने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की आम्ही मध्यस्थता म्हणून भाग घेणार नाही. यावर न्यायालयानेच निर्णय घ्यावा. यावर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की आम्ही सुनावणी करत आहे आणि 18 ऑक्टोबर पर्यंत सुरु राहिलं.

01.16 – सुनावणी दरम्यान चीफ जस्टिस रंजन गोगोईनी सांगितले की आम्हाला या प्रकरणातील वेळेची मर्यादा लक्षात आहे, जर आवश्यकता भासली तर शनिवार सुनावणी होईल.

12.50 – मुस्लिम पक्षाचे मत मांडताना निजम पाशा म्हणाले की जेव्हा बाबर राज्य करत होता तेव्हा तो कोणालाही उत्तरदायी नव्हत्या. त्यांनी कुरान आणि कायद्यानुसार राज्य केले. विरोधी पक्ष म्हणत आहे की बाबरने मस्जिद बनवून पाप केले परंतू त्यांनी कोणतेही पाप केले नाही.

या दरम्यान जस्टिस बोबडे यांनी सांगितले की आम्ही येथे बाबरच्या पाप पुण्याचा निर्णय करण्यासाठी बसलेलो नाही, आम्ही येथे कायदेशीर पद्धतीने ताब्यावर करण्यात येणाऱ्या दाव्यावर परिक्षण करत आहोत.

18 ऑक्टोबर पर्यंत होणार सुनावणी
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले की सुनावणीसाठी वेळीची मर्यादा आहे, त्यामुळे प्रयत्न हा पाहिजे की 18 ऑक्टोबरच्या आत सुनावणी संपावी. जर असे झाले नाही तर लवकरच निर्णयाची आशा संपेल.

आठवड्यात 5 दिवस सुनावणी
आठवड्यात 5 दिवस सुनावणी सुरु आहे. तसेच रोज एक तास अधिक वकीलांचे मत लक्षात घेतले जात आहे. शिवाय असे झाले नाही तर शनिवारी देखील प्रकरणावर सुनावणी करु शकतात.

हिंदू पक्ष देणार मुस्लिम पक्षाला उत्तर
मुस्लिम पक्षाने ASI रिपोर्टवर प्रश्न चिन्ह उपस्थित करुन त्यांची तपासाची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की कोणाकडे ही कोणत्याही पक्षाकडे योग्य पुरावे नाहीत. प्रत्येक जण ASI रिपोर्टच्या आधारे तर्क लावत आहेत.

सर्वोच्च न्यायालयात अयोध्या प्रकरण मागील 60 वर्षापासून आहे. परंतू अजूनही निर्णय झाला नाही. परंतू यंदा या निर्णयावर सुनावणी होत आहे. मागील मध्यस्थ फायदेशीर ठरला नाही, त्यानंतर 6 ऑगस्ट पासून प्रकरणावर रोज सुनावणी सुरु आहे. आता पर्यंत न्यायालयात हिंदू महासभा, निर्मोही आखाडा, सुन्नी वक्फ बोर्ड समेत सर्व पक्षकारांना आपला पक्ष ठेवला आहे.

या प्रकरणी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत पाच न्यायाधीश आहेत. CJI शिवाय या घटनापीठात एस.ए. बोबडे, जस्टिस डी. वाय, चंद्रचूड, अशोक भूषम आणि एस.ए. नजीर यांच्या समावेश आहे.

Visit : policenama.com