बाबरी मस्जिदच्या स्लॅबवर काहीतरी संस्कृतमध्ये लिहीलं होतं, SC मध्ये रामललांच्या वकिलांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिदच्या प्रकरणावर गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सुरु आहे. मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वातील पाच न्यायाधीशांच्या संविधान पीठाने रामलला विराजमानचे वकील सी.एस वैद्यनाथन यांची बाजू ऐकून घ्यायला सुरवात केली. यावेळी वकिलांनी ‘एएसआई’च्या रिपोर्टची आठवण करून देताना सांगितले की, अयोध्या येथे मस्जिद बांधण्यासाठी हिंदू मंदिर पाडण्यात आले. ‘एएसआई’च्या रिपोर्टमध्ये मगर आणि कासवाच्या आकृत्यांचा उल्लेख आहे ज्याचा मुस्लिम संस्कृतीशी काहीच संबंध नाही असे म्हणत त्यांनी अन्य पुरातत्वीय दाखले देत येथे हिंदू मंदिर असल्याचे दाखले दिले.

सीएस वैद्यनाथ यांनी यावेळी सांगितले की, ज्यावेळी बाबरी मस्जिद पाडण्यात आली होती त्यावेळी मस्जिदच्या स्लॅबवर संस्कृतमध्ये काहीतरी लिहिले होते. ज्याचे फोटोही काढण्यात आले होते. नंतर पोलिसांनी ते स्लॅब जप्त केले.

६ ऑगस्ट पासून याबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात रोज सुरु करण्यात आली आहे. न्यायालयाने दोनीही बाजूच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घ्यायला सुरुवात केली आहे. आठवड्यातून दर पाच दिवस याची सुनावणी सुरु असल्यामुळे वकिलांनी आम्हाला माहिती मिळवण्यासाठी वेळ मिळत नसल्याचे यावेळी सांगितले आहे.

वरिष्ठ वकील राजीव धवन यांनी सांगितले की, न्यायालयात अजून कोणीही साक्षिदार सादर करण्यात आलेला नाही. सगळी सुनावणी ही अल्हाबादच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आधारित आहे. यावर सीजेआईने नाराज होऊन सांगितले की, त्यांनी मुस्लिमांची बाजू मांडावी दुसऱ्यांच्यामध्ये अडसर बानू नये. याबाबत आपले म्हणने मांडण्यासाठी सगळ्या पक्षांना संधी मिळणार आहे.

वैद्यनाथन यांनी सांगितले की, हाय कोर्टाच्या तीनही न्यायाधीशांचे एक मत होते की, या जागेवर कधीही मुस्लिम पक्षाचा हक्क नव्हता आणि त्यांनी इथे हिंदू मंदिर असल्याच्या सत्यतेला मान्य केले होते. जस्टिस एस यू खान यांचे मत थोडे वेगळे होते परंतु त्यांनीही पूर्णपणे मंदिरा बाबतच्या गोष्टींना नाकारले नव्हते.

आरोग्यविषयक वृत्त –