अयोध्या प्रकरण : सुप्रीम कोर्टात आठवड्यातील सलग 5 दिवस चालणार प्रकरणाची ‘सुुनावणी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्येच्या रामजन्मभूमीची ऐतिहासिक सुनावणी लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे. याआधी ३ दिवस या प्रकरणाची नियमित सुनावणी होत होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी आणखी दोन दिवस म्हणजेच ५ दिवस चालणार असल्याचे जाहीर केले आहे. आता ही सुनावणी सोमवार ते शुक्रवार असे ५ ही दिवस चालणार आहे. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठापुढे सुरु आहे.

३ दिवसांऐवजी ५ दिवस सुनावणी –

या आधी न्यायलयाने ही सुनावणी लागोपाठ ३ दिवस चालणार आहे असे सांगण्यात आहे होते. परंतू आता ही सुनावणी ५ दिवस चालणार आहे. आज सलग ३ ऱ्या दिवशी झालेल्या सुनावणीत प्रभू रामललाचे वकील ज्येष्ठ विधीज्ञ परासरन यांनी आपला युक्तीवाद मांडला. त्यांनी युक्तीवादात मांडताना सांगितले की, या प्रकरणात दावेदार असलेल्या निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्या याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने रद्द केल्या आहेत. कारण त्यांनी याचिका दाखल करण्यात विनाकारण विलंब केला होता. तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश फक्त पूजेचा अधिकार मागण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या गोपालसिंह विशारद यांच्या याचिकेवरच होता.

मात्र आता आठवड्याचे सर्व पाच दिवस सुनावणी होणार असल्याने आता सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या कार्यकाळातच हे चिघलेले प्रकरण निकाली लागेल की नाही याची चर्चा सुरु झाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त