अयोध्या : राम मंदिराच्या निर्माणासाठी देणगी देण्याची इच्छा, SBI नं सांगितली ऑनलाइन प्रक्रिया, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी जर श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला ऑनलाईन दान करायचे असेल तर स्टेट बँक ऑफ इंडियाने यासाठी मार्ग सांगितला आहे. या प्रक्रियेद्वारे आपण श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला ऑनलाइन देणगी देऊ शकता आणि देणगीची पावती देखील मिळवू शकता. आपण कोणत्याही बँकेत खाते असल्यास किंवा कोणत्याही बँकेच्या एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्डसह इच्छित रक्कम हस्तांतरित करू शकता. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट केंद्र सरकारने राम मंदिर निर्मिती व संचालनासाठी स्थापन केलेली ट्रस्ट आहे.

कशी द्यावी ऑनलाइन देणगी
– सर्वात आधी आपल्याला onlinesbi.com वर लॉग इन करावे लागेल. यानंतर तुम्हाला स्टेट बँक कलेक्ट ( SB collect ) चा पर्याय निवडावा लागेल. त्यावर क्लिक करून, आपल्याकडे पुढे जाण्याचा पर्याय असेल. त्यावर क्लिक करण्यापूर्वी आपल्याला अटी मान्य करण्यासाठी बॉक्स वर क्लिक करावे लागेल.

– यानंतर, आपल्याकडे स्टेट ऑफ कॉर्पोरेट / इंस्टीट्यूशन आणि टाइप ऑफ कॉर्पोरेट / इंस्टीट्यूशनचा पर्याय असेल. यात वरील पर्यायात, आपण उत्तर प्रदेशात आणि खालील पर्यायामध्ये धार्मिक संस्था निवडा आणि क्लिक करा.

– पुढील पेजवर आपणास धार्मिक संस्थेचे नाव विचारले जाईल. येथे तुमच्यासमोर श्री रामजन्मभूमी मंदिर परिसराचा पर्याय असेल. आपण त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर आपणास नाव, पत्ता आणि रक्कम यासारखी वैयक्तिक माहिती विचारली जाईल. हा कॉलम भरल्यानंतर आपण घरी बसून रामलल्ला मंदिरासाठी दान करू शकता.