शरयू किनारी आजपासून सुरू होणार ‘रामलीला’, असरानी ‘नारद’ तर मनोज तिवारी ‘अंगद’ बनणार

अयोध्या : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संकटादरम्यान अयोध्यामध्ये शरयू नदीच्या किनार्‍यावर यावेळी भव्य रामलीला होणार आहे, जिची सुरूवात आज शनिवारपासून होणार आहे. या रामलीलामध्ये सिनेजगतातील अनेक स्टार्ससुद्धा सहभागी होतील. भारतीय जनता पार्टीचे 2 खासदार आणि अभिनेतेसुद्धा आपआपल्या भूमिका करताना दिसणार आहेत.

या भव्य रामलीलाचे प्रसारण सोशल मीडियावर सुद्धा करण्यात येईल. रामलीला आज शनिवारपासून 25 ऑक्टोबरपर्यंत चालेल. शरयू नदीच्या किनार्‍यावर लक्ष्मण किल्ल्याच्या मैदानात या रामलीलाचा भव्य सेट उभारण्यात आला आहे. रामलीलामध्ये बॉलीवुडचे प्रसिद्ध अ‍ॅक्टर सुद्धा सहभागी होणार आहेत.

भाजपा खासदार मनोज तिवारी आणि रवि किशन सुद्धा यामध्ये सहभागी होणार आहेत. मनोज तिवारी अंगद आणि रवि किशन भरतची भूमिका करणार आहे. टीव्ही सीरियल रामायणमध्ये हनुमानाची भूमिका करणारे दारा सिंह यांचे पूत्र आणि अभिनेते बिंदू दारा सिंह या रामलीलामध्ये हनुमानाची भूमिका करतील.

प्रसिद्ध कॉमेडियन असरानी नारदाच्या भूमिकेत असतील. शहबाज खान रावण आणि रजा मुराद अहिरावणच्या भूमिका करतील. सोनू नागर राम आणि कविता जोशी सीतेच्या भूमिकेत दिसतील.

रामासाठी वस्त्र जनकपुरातून आणले गेले आहेत. रामाचे धनुष्य कुरुक्षेत्रातून मागवण्यात आले आहे. तर सीतेचे दागिने अयोध्येत तयार केले आहेत. रावणाचा पोषाख श्रीलंकेतून तयार करून आणण्यात आला आहे. ही रामलीला 14 विविध भाषांमध्ये डिजिटलपद्धतीने उपलब्ध असेल.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही रामलीलात येण्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे, परंतु अजूनपर्यंत ते उपस्थित राहणार असल्याबाबत दुजोरा मिळू शकलेला नाही.