उद्धव ठाकरेंनी असे काहीही करु नये की देशातील वातावरण बिघडेल : इकबाल अंसारी

नवी दिल्ली – वृत्तसंस्था :  १६ जूनला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. ते अयोध्येत जाण्याआधीच आता वाद निर्माण झाला आहे. राम मंदिर प्रकरणातील विरोधी पक्षातील मुस्लिम पक्षाकार इकबाल अंसारी यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. अंसारी म्हणाले की अयोध्या काही राजकारणाचा अड्डा नाही. अयोध्या हे एक धर्मस्थळ आहे असे असले तरी राजकीय नेते येथे फक्त राजकारण करण्यासाठी येतात. आपल्या फायद्यासाठी ते रामजन्मभूमी – बाबरी मस्जिदचे राजकारण करतात.

त्यांनी सांगितले की, अयोध्या साधू संताचे शहर आहे, आणि जेथे साधु असतात तेथे शांती असते, उद्धव ठाकरेंना समज देत ते म्हणाले की नेता अयोध्या सोडून आणखी दुसर शहर शोधा. इकबाल अंसारी पुढे म्हणाले की, अजून नवी संसद सुरु देखील झाली नाही परंतू राम मंदिर-बाबरी मस्जिद यावर राजकारण सुरु झाले देखील. ते म्हणाले आयोध्येतील वातावरण तापवणे म्हणजे पूर्ण देशातील वातावरण तापवल्याप्रमाणे आहे.

मुस्लिम पक्षकार इकबाल अंसारी म्हणाले की, हे प्रकरण न्यायालयात आहे, दोन्ही पक्षांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहिली पाहिजे. परंतु हिंदु पक्षाला न्यायालयावर विश्वास नाही, हे तेच लोक आहेत जे संविधानाला मानत नाहीत. सर्वोच्च्य न्यायालयात समाधानासाठी मध्यस्थ पॅनल बनवण्यात आले आहे आणि न्यायालय या प्रकरणी आपले काम करत आहे. या लोकांना अजून थोडे दिवस वाट पाहिली पाहिजे.

शिवसेनेबद्दल बोलताना अंसारी म्हणाले की, शिवसेना फक्त मुंबईपर्यंत सीमित आहे, उत्तर प्रदेशात त्यांची डाळ शिजणार नाही. ते म्हणाले उद्धव ठाकरेंनी अयोध्येत पूजा करण्यासाठी जरुर यावे. परंतु राजकारण करुन नये. उद्धव ठाकरेंनी असे कोणतेही काम करु नये, ज्यामुळे देशातील वातावरण खराब होईल.

आरोग्यविषयक वृत्त –

‘या’ आयुवेर्दिक उपायांमुळे तणाव होईल दूर

गरोदरपणा नंतरचा लठ्ठपणा नको ? मग ‘हे’ पाणी प्या

डिप्रेशनवर उपचार करा घरच्या घरी ; ‘ह्या’ सात सोप्या पद्धती

गरोदरपणातील समज-गैरसमज ? जाणून ‘घ्या’ सत्य