अयोध्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं ठरवली ‘डेडलाईन’, 18 ऑक्टोबर नंतर ‘निकाल’ कोणत्याही क्षणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या अनेक वर्षांपासून बाबरी मशीदचा विषय सुरु आहे. न्यायालयात या विषयीच्या हालचालींना आता वेग आला आहे. अयोध्या बाबतच्या २६ व्या दिवसाची सुनावणी सुरु झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या संविधान पिठात यावर विचार विनिमय सुरु आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले की, अयोध्या बाबतच्या निर्णयावर आम्ही १८ ऑक्टोबर पर्यंत सुनावणी पूर्ण करू.

मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले की, सर्व पक्षांना एक महिन्यात ही सुनावणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. गरज भासल्यास आम्ही शनिवारी सुनावणीसाठी तयार आहोत. यानंतर, आम्हाला निर्णय घेण्यासाठी चार आठवड्यांचा कालावधी मिळेल.

मध्यस्थी आणि सुनावणी या गोष्टी सोबत होणार –
सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले की, मध्यस्थीसंदर्भात एक पत्र प्राप्त झाले आहे. जर पक्षांना परस्पर वाटाघाटीद्वारे हा विषय निकाली काढायचा असेल तर तो कोर्टासमोर ठेवा. आपण मध्यस्थी करू शकता. त्याची गोपनीयता राहील.

सगळ्या पक्षांच्या उत्तरानंतर SC निर्णय देणार –
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सर्व पक्षांना सांगितले आहे की, १८ ऑक्टोबरपर्यंत अयोध्या वादातील वाद विवाद संपला जाईल. सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षांना त्या वेळेबद्दल विचारणा केली होती. प्रत्येकाच्या उत्तरानंतर सर्वोच्च न्यायालयाने वेळ निश्चित केली आहे.

visit : policenama.com