शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंच्या दौर्‍यादरम्यान अयोध्येत ‘हायअलर्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्येत 2005 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना 18 जूनला शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचा निर्णय न्यायालयाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे संभाव्य दहशतवादी हल्लांच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत हायअलर्ट लागू करण्यात आला आहे. 5 जून 2005 रोजी अयोध्येतील वादग्रस्त परिसरात दहशतवादी हल्ला झाला होता. या प्रकरणी आरोपींना 18 जून रोजी अलाहाबाद कोर्ट शिक्षा सुनावणार आहे. याच दरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे अयोद्धेच्या दौऱ्यावर असणार आहे.

हायअलर्टमुळे अयोध्येत मोठा बंदोबस्त
 उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा आज अयोध्या दौऱ्यावर आहेत, तर उपमुख्यमंत्री केशव मौर्या यांच्या उपस्थितीत उद्या धर्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर 16 जूनला उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असणार आहे. या कारणाने अयोध्येत पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या अयोध्येत अनेक नेते मंडळींची वर्णी लागत असल्याने अयोध्येत ये-जा करणाऱ्यांची तपासणी होणार आहे. धर्मशाळा, अयोध्येतील हॉटेल या सर्वावर पोलिस नजर ठेवून असणार आहेत.

उद्धव ठाकरे यांची अयोध्येत राम मंदिर उभे राहावे अशी मागणी आहे, आणि त्यासाठी ते सरकारला आठवण करून देण्यासाठी अयोध्येचा दौरा करणार आहेत. उद्धव ठाकरे 16 जूनला अयोध्येत आपल्या 18 खासदारांसह रामललाचे दर्शन घेणार आहेत. आपण शपविधी आधी आणि राज्यमंत्री मंडळाच्या विस्तारा आधी अयोध्येला जाणार अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी या आधी केली होती.

सिने जगत –

कतरिना कैफने करिअरबाबतीत केला ‘हा’ मोठा खुलासा
अर्जुन कपूरच्या शर्टलेस फोटोला पाहून ‘थक्क’ झाली मलायका, म्हणाली…..

#Video : ‘बाहुबली ३’ चित्रपटाचे निर्देशन ‘या’ निर्मात्याने केले पाहिजे : तमन्ना भाटिया

#Video : भोजपुरीचं सर्वात लोकप्रिय ‘ऑनस्क्रीन’ कपल झालं ‘विभक्‍त’ ; पण, त्यांचा जुना व्हिडीओ घालतोय धुमाकूळ

You might also like