सरकारसह संघ, हिंदूत्ववादी संघटनांचा अयोध्या ‘प्लॅन’ तयार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राम मंदिराबाबतचा निर्णय लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेशात तणावपूर्ण शांतता आहे. पहिल्या पासूनच राम मंदिर बनावे हा भाजपचा अजेंडा होता त्यामुळे भाजपचे सरकार केंद्रात येताच याबाबतच्या हालचालींना वेग आला होता. निर्णय लागण्याआधीच संघ आणि भाजपने याबाबत तयारी सुरु केली आहे.

अयोध्या निकालानंतर समाजातील एका मोठ्या वर्गात प्रचंड अस्वस्थता निर्माण होईल त्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत हे वारंवार अनेक मुस्लिम पदाधिकाऱ्यांच्या भेटी गाठी घेत आहेत. तसेच यानंतर हिंदू संघटनांकडून इतर मंदिरांच्या निर्मितीची सुद्धा मागणी केली जाऊ शकते याबाबतची शंका मुस्लिम समाजाकडून उपस्थित केली जात आहे.

राम मंदिर आंदोलनावेळी “ये तो पहली झांकी है, काशी, मथुरा बाक़ी है”, अशा प्रकारच्या घोषणा दिल्या आहेत. मात्र, काशी आणि मथुरेवर कोणतीही चर्चा केली जाणार नसल्याचे संघाकडून सांगण्यात आले आहे. तसेच न्यायालय जो निर्णय देईल त्याचा आम्ही सन्मान करू असे संघाच्या चार मोठ्या नेत्यांनी देखील स्पष्ट केले आहे.

संघातर्फे निकालानंतरची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांना याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच माध्यमांना कोणीही प्रतिक्रिया देऊ नये आणि निकालानंतर शांतात ठेवण्याचे आदेश देखील सर्वांना देण्यात आले आहेत. याबाबतच्या अनेक बैठका देशातील प्रमुख शहरांमध्ये घेण्यात आलेल्या आहेत.

न्यायालयाच्या निकालानंतर सरसंघचालक मोहन भागवत सर्वात आधी प्रतिक्रिया देऊ शकतात असे सांगण्यात येत आहे. तसेच यासंबंधात ते दिल्लीमध्ये पत्रकार परिषद सुद्धा घेऊ शकतात तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील यावेळी आपली प्रतिक्रिया देतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके