Ayodhya Ram Mandir : भूमिपूजनापुर्वीच दानपेटीत ‘इतकी’ रक्कम जमा, ‘रामलल्ला’ झाले अब्जाधीश

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा होण्याआधीच रामलल्ला अब्जाधिश झाले आहेत. देश आणि जगभरातून लाखो राम भक्त सतत ट्रस्टच्या बँक खात्यात देणगी रक्कम जमा करत आहेत. अयोध्येच्या भारतीय स्टेट बँकेने दिलेल्या माहितीनुसार, रामलल्लाच्या खात्यात भाविकांकडून सतत येणार्‍या देणग्यांमुळे ते आता अब्जाधीश झाले आहेत.

देशासह जगातील विविध देशात राहणारे हजारो लोक बँकेतून देणगी देण्याच्या प्रक्रियेबद्दलही विचारपूस करीत आहेत. देणगीदारांची संख्या लाखोंमध्ये आहे. फेब्रुवारी महिन्यात श्री रामजन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर एसबीआय बँकेत मंदिर बांधण्यासाठी खाते उघडले गेले. मात्र, त्यानंतर लगेचच कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. असे असूनही भाविकांनी दान म्हणून साडेचार कोटी रुपये जमा केले. दरम्यान, राम मंदिर भूमिपूजनाची तारीख निश्चित झाली तेव्हा ती देणगी आणखी वाढली. ही तारीख जाहीर होण्यापूर्वी रामललाच्या खात्यात 20 कोटी रुपये जमा होते. याबाबत माहिती देताना ट्रस्टचे कोषाध्यक्ष महंत गोविंद देव गिरी म्हणाले की, अनेक लोकांनी कोट्यावधी दान केले आहे.

यात रामकथा वाचक संत मुरारी बापूंच्या आवाहनावरून त्यांच्या अनुयायांनी चार दिवसांत 18 कोटींची रक्कम जमा केली. यामध्ये भारतात राहणार्‍या भाविकांनी 11 कोटींची देणगी दिली असून ती काल रामजन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खात्यात जमा करण्यात आली. बँक स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 60 टक्के देणगीदार तरूण आणि तरूण वयोगटातील आहेत, कारण हजारो लोक 1101 रुपये, 501 रुपये, अगदी 101 रुपयांपर्यंत देणगी देत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like