राममंदिर भूमिपूजन : पिंपरी-चिंचवडमध्ये वाटणार 10 लाख लाडू

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा आज पार पडत आहे. भूमिपूजनासाठी उत्तर प्रदेशात अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. दरम्यान, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने जिथे आहात तिथून हा ऐतिहासिक क्षण पहावा असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

दुसरीकडे, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपच आमदार महेश लांडगे यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये 10 लाख लाडू वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मात्र, पोलिसांनी यार आक्षेप घेतला असून आमदार महेश लांडगे यांना कायदेशीर नोटीसही बजावली आहे.

आज राममंदिर भूमिपूजन सोहळा अयोध्येत होत असताना त्याच्या पूर्वसंधेला कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत पोलीस प्रशसानाने महाराष्ट्रातील भाजपच्या आमदारांना नोटीस पाठवी आहे. पहिली नोटीस भोसरीचे आमदार आणि पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांना बजावली आहे. तसेच आमदार महेश लांडगे यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात आले आहे.

आमदार लांडगे यांच्याकडून 10 लाख लाडू
राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड भाजपच्या वतीने तब्बल दहा लाख मोतीचूर लाडुचे वाटप करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील सुमारे 40 प्रमुख चौकात लाडू वाटप करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु लाडू वाटपचा कार्यक्रम घेऊ नये. त्यामुळे कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे आणि तसं झाल्यास त्याची सर्व जबाबदारी आपल्यावर असेल हे लक्षात घेऊन कार्यक्रम रद्द करावा, अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, इंद्रायणी नगर येथील एका मोठ्या हॉलमध्ये लाडू बनवण्याचे काम मागील दोन दिवसांपासून सुरु आहे. तसेच लाडू बनवणाऱ्या कामगारांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून लाडू तयार करण्यात येत आहेत. या उपक्रमासाठी आपल्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे सांगत सध्या तरी नोटीसी नंतर पुढील काय भूमिका असेल हे आमदार लांडगे यांनी स्पष्ट केलं नाही.