‘या’ कारणामुळे राम मंदिर उभारणीस उशीर होणार, जाणून घ्या

अयोध्या : वृत्तसंस्था –  अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरास विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राम मंदिराचा पाया खोदताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असून या अडचणी दूर करण्यासाठी देशभरातील आयआयटी (IIT) तज्ज्ञांसोबत सल्लामसलत सुरु आहे. यामुळे 2024 मध्ये पूर्ण होणारे राम मंदिराचे काम आता 2025 मध्ये पूर्ण होण्याची चिन्ह आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला. यानंतर 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर राम मंदिर उभारणीच्या कामाला सुरुवात झाली. 15 जानेवारी पासून पायाभरणीचे काम सुरु करण्यात आले. बांधण्यात येणारे हे मंदिर पुढील एक हजार वर्षे कसं सुरक्षित राहील यासाठी एलएनटी आणि टाटा कन्स्ट्रक्शनचे सर्व इजिनिअर्स काम करत आहेत.

अशा प्रकारे सुरु आहे काम

अयोध्येत बांधण्यात येणाऱ्या राम मंदिरामध्ये एकूण 1200 खांब उभारण्याची योजना आहे. काही दिवसांपूर्वी या खांबावर वजन टाकण्यात आले. त्यावेळी पायाशी असलेली जमीन काही इंच खाली दबली गेली. त्यावेळी ती माती वाळूमिश्रित असल्याचे निष्पन्न झाले. या अडचणीवर मात करण्यासाठी मंदिराची उभारणी हार्ड स्टोननं करण्यात येणार आहे. यासाठी पायाच्या आतमध्ये जुन्या पद्धतीने जवळपास 50 फुट खोल खड्डे खोदले जाणार आहेत.

पायाभरणीसाठी मिर्झापूरचे दगड

पायाभरणीसाठी मिर्झापूरचे खास दगड वापरण्यात येणार असून या दगडांवर मंदिराची उभारणी केली जाणार आहे. या मंदिराच्या बांधकामाचं काम देशातील 9 इंजिनिअरिंग इंस्टीट्यूटचे टॉप इंजिनिअर्स करत असल्याची माहिती श्री रामजन्मभुमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष चंपत राय यांनी दिली.