राम मंदिरासाठी लागणार्‍या ’पिंक स्टोन’खाणीचे काम राजस्थान सरकारने थांबवले

पोलिसनामा ऑनलाईन – अयोध्येच्या राम मंदिर निर्माणासाठी पिंक स्टोन वापरले जाणार आहेत. मात्र, राजस्थान काँग्रेस सरकारने बंसी पहाडपूरमधील गुलाबी दगड खाणीवर बंदी आणली आहे. त्यामुळे पिंक स्टोनसाठी अडथळा निर्माण झाला आहे.

अयोध्येज राम मंदिरासाठी जवळपास 3 लाख घनफूट दगडांची आवश्यकता आहे. आतापर्यंत 1 लाख घनफूट दगडांची व्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास 20 हजार घनफूट दगड रामसेवक पुरममध्ये ठेवलेले आहे. आता उरलेले दगडे हे बंसी पहाडपूर येथील खाणीतून अयोध्येसाठी मागवण्यात आले होते. पण आता काँग्रेस सरकारने या खाणीचे काम थांबवले आहे. त्यामुळे राम मंदिराच्या कामाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. परंतु, या मुद्द्यावर राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांनी वेळ आल्यावर योग्य माहिती दिली जाईल, अशी प्रतिक्रिया दिली. मागील काही दिवसांमध्ये राजस्थान मायनिंग विभाग, हरातपूर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी बंसी पहाडपूरमध्ये अवैध्य खाण उत्खनन होत असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या. कोणत्याही परवानगीशिवाय उत्खनन सुरू होते, त्यामुळे कारवाई करण्यात आली अशी माहिती जिल्हाधिकारी नथमल दिदेल यांनी दिली.