अयोध्यामध्ये Top चं पर्यटन स्थळ बनवण्याची तयारी, मोदी सरकार खर्च करणार एक लाख कोटी रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राम मंदिराचे बांधकाम वाढत जाईल, ज्यासोबत अयोध्याचे रूप सुद्धा भव्य ते अतिभव्य होत जाणार आहे. केंद्र सरकार तीर्थनगरीचा कायापालट करण्यासाठी एक लाख कोटी रुपये र्ख करणार आहे. अयोध्याने श्रीरामाच्या भक्तांसाठी महत्वपूर्ण होण्यासह जागतिक पर्यटनाच्या नकाशावर सुद्धा आपले स्थान निर्माण करावे, याची ओळख अशी व्हावी, जशी जगातील सर्वात मोठ्या तिर्थस्थळांची आहे, असा प्रयत्न आहे. श्रीरामांशी संबंधीत स्थळांच्या विकासासह अयोध्याला सुद्धा वर्ल्ड क्लास आधुनिक सुविधायुक्त केले जाईल. रेल्वे, रस्ते आणि हवाई, प्रत्येक संपर्क मार्गाने अयोध्याची कनेक्टिव्हिटी वाढवली जाईल.

जर कुणी बाहेरून अयोध्यामध्ये आले तर त्यास कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, असा प्रयत्न असणार आहे. सूत्रांच्या महितीनुसार, पुढील पाच वर्षात जगाला अयोध्याचे असे रूप पहायला मिळवे की, मोस्ट फेव्हरेट टूरिस्ट डेस्टिनेशनमध्ये याची गणना व्हावी, असे सरकारला वाटते. एअरपोर्ट, रेल्वे, इन्फ्रास्ट्रक्चर, वीज यासारखे काहीही असो, सरकारने अयोध्या आणि जवळपासच्या परिसराला चमकवण्यासाठी कंबर कसली आहे.

फाईव्ह स्टार हॉटेल उघडण्यासाठी मोठ्या बिझनेस ग्रुपशी चर्चा
अयोध्यामध्ये मंदिर परिसरात आठ किमी अंतरातील परिसरात फाईव्ह स्टार हॉटेल उघडण्यासाठी मोठ्या बिझनेस ग्रुपशी चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय येथे सर्व सोयी सुविधायुक्त धर्मशाळांचे जाळे निर्माण करण्याची तयारी सुरू आहे. अयोध्या भूमिपूजनानंतर जगाच्या नजरेत आले आहे. अशावेळी अयोध्याच्या ‘ओव्हरऑल डेव्हलपमेंट’ साठी रोडमॅपवर वेगाने काम केले जात आहे. याशिवाय अयोध्याची सुरक्षा व्यवस्था सुद्धा कडेकोट करण्याची गरज आहे. यासाठी हायटेक पद्धत अवलंबली जाणार आहे.

तीर्थनगरीच्या जुन्या मंदिरांबाबत निर्णय
काशी विश्वनाथ कॉरिडोरप्रमाणे राम मंदिराच्या जवळपासच्या जुन्या आणि जीर्ण मंदिरांमधील देवी-देवतांच्या मूर्ती राम मंदिरात स्थापन करण्यात येतील. अयोध्यातील जुन्या मंदिरांना पुरातत्व विभागाकडून सुधारण्यात येईल. ही मंदिरे अयोध्याची संस्कृती आणि वारसा आहे, त्यांना गांभिर्याने सजवण्यात येईल.

अयोध्यामध्ये पतंजलीला उघडायचेय विद्यापीठ
देशातील अनेक साधु-संत अयोध्यामध्ये आपले आश्रम किंवा मठ उघडण्याच्या तयारीत आहेत. अनेक साधु-संत असे आहेत ज्यांचे आश्रम मथुरा, वृंदावन आणि हरिद्वारमध्ये आहेत पण अयोध्यामध्ये नाहीत. ते सर्वजण लवकरात लवकर आपले आश्रम उभारण्याच्या तयारीत आहेत. योगगुरु बाबा रामदेव यांनी पतंजली विद्यापीठ आणि जूना अखाडाचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद यांनी अयोध्यामध्ये जूना अखाडा स्थापन करण्याची इच्छा उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारकडे व्यक्त केली आहे.

वाढू लागले जमीनीचे भाव
अयोध्यामध्ये विकास मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे जाणवल्याने येथे जमीनीचे भाव वेगाने वाढू लागले आहेत. आगामी काळात येथे मोठे टूरिस्ट हब होणार असल्याने इंडस्ट्रीशी संबंधीत उद्योजकांनी तीर्थनगरीकडे आपला मोर्चा वळवला आहे. यामुळे काही महिन्यातच अयोध्यामध्ये जमीनीचे भाव आकाशाला भिडले तर नवल वाटायला नको. अयोध्यामध्ये वेगाने विकास होईल, जागतिक दर्जाच्या सुविधा असणारी हॉटेल, सेंटर्स उघडतील, येथे रोजगाराची संधी वाढेल, याचा लाभ स्थानिक लोकांना होणार आहे.

मोदी सरकार आणि योगी सरकारचे अयोध्याच्या विकासाकडे पूर्ण लक्ष आहे. दसर्‍याला योगी सरकार अयोध्यामध्ये मोठ्या कार्यक्रमाची तयारी करत आहे. ज्यामध्ये राम लीलाचे सुद्धा मंचन होईल. यामध्ये रामायणातील पात्र बॉलीवुड-भोजपुरी सिनेमातील अनेक मोठे कलाकार साकारताना दिसतील. अयोध्यामध्ये सरयू नदीच्या रिव्हरफ्रंटचे सौंदर्यीकरण, नदीच्या किनारी अडीचशे मीटर उंच श्रीरामाची मूर्ती उभारणे, राम कथा म्यूझियम बनवणे, रेल्वे स्टेशन आणि बस स्टेशन अधुनिक सुविधांनी सज्ज करणे आदी कामे केली जाणार आहे. केंद्र सरकार रामायण सर्किट अंतर्गत अयोध्यासह श्रीरामाशी संबंधीत देशातील सर्व स्थळे आपसात रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गाने जोडण्याचे काम करत आहे. याचा पुढे नेपाळ आणि श्रीलंकापर्यंत विस्तार करण्यात येईल.