‘पप्पांनी राम मंदिरासाठी जीव दिला होता, आम्हाला देखील मिळावं भूमीपूजनाचं निमंत्रण’

मुजफ्फरपुर : अयोध्यात राम मंदिराचे भूमीपूजन 5 ऑगस्टरोजी होत आहे. यादरम्यान, राम मंदिर आंदोलनात जीव गमावलेले बिहारचे संजय कुमार यांच्या कुटुंबाला आशा आहे की, भूमीपूजनसाठी त्यांनाही निमंत्रण मिळेल. संजय यांच्या कुटुंबाला निमंत्रण येण्याची प्रतिक्षा आहे. त्यांनी मागणी केली आहे की, मंदिर आंदोलनात जीव गमावलेल्या लोकांच्या नावाचा शिलालेख सुद्धा मंदिर परिसरात लिहिला जावा.

2 नोव्हेंबर 1990च्या दिवशी 5 हजार कारसेवकांचा जत्था मंदिराकडे निघाला होता. यावेळी हनुमान गढीजवळ मागच्या बाजूने युपी पोलिसांनी गोळीबार केला, ज्यामध्ये 5 लोकांचा जीव गेला. त्यामध्ये एक मुजफ्फरपुर जिल्ह्यातील सायन गावचे संजय कुमार सिंह सुद्धा होते. संजय कुमार यांना पोलिसांची गोळी लागण्याने त्यांचा मृत्यू झाला.

संजय आपल्या कुटुंबाचे एकमेव पुत्र होते आणि विधवा वृद्ध आई, पत्नी आणि दोन लहान मुलींना सांभाळत होते. संजय यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर अतिशय वाईट परिणाम झाला, कारण मुलींचे वय खुपच कमी होते. मोठी मुलगी दोन वर्ष नऊ महिन्यांची तर दुसरी 45 दिवसांची होती.

संजय यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला अतिशय हलाखीचे दिवस काढावे लागले. संजय यांची मोठी मुलगी स्मृती संजय यांनी निमंत्रण मिळाले नसल्याचे सांगितले आणि म्हटले की, निमंत्रण मिळाले पाहिजे होते. त्यांनी वडीलांची आठवण काढत म्हटले की खुपच कमी आठवते, कुटुंबात अचानक वातावरण बदलले होते आणि वडीलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला खुप संघर्ष करावा लागला. आज खुप आनंद होत आहे की, वडीलांचे स्वप्न, ज्याच्यासाठी त्यांनी आपले बलिदान दिले, ते पूर्ण होत आहे. आई जिवंत असती तर आणखी खुश झाली असती.

त्याकाळी संजय यांचे अतिशय जवळचे मित्र असलेले अरविंद कुमार यांनी सांगितले की, 2 नोव्हेंबर 1990 ची घटना आहे. कार सेवकांचे पथक मंदिराकडे निघाले होते. एवढ्यात हनुमान गढीजवळ मागून पोलिसांनी गोळीबार केला, ज्यामध्ये 5 लोकांचा मृत्यू झाला. आता मंदिराचे भूमीपूजन होत आहे. यासाठी संजयच्या कुटुंबाला निमंत्रित केले पाहिजे. आम्ही मीडियाच्या माध्यमातूनसुद्धा मागणी करतो की, संजयच्या कुटुंबाला निमंत्रण द्यावे.