अयोध्या निकाल : बाबरी मशिदीच्या समर्थनार्थ उतरले DMK नेता ए. राजा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मज्जीदच्या बाबतीत एक महत्वाचे विधान केले होते. मुसलमान पक्षाला कोर्टाने सवाल केला आहे की, बाबरीच्या उध्वस्त केलेल्या ढाच्यावर वाघांचे, पक्ष्यांचे आणि फुलांचे चित्र आढळून आले आहे. त्याबाबत कोर्टाने मुस्लिम पक्षांची बाजू मांडणाऱ्या प्रतिनिधींना सवाल केला आहे की, मज्जीदमध्ये अशी चित्रे असतात का ? अयोध्ये बाबतची सुनावणी वेगात सुरु आहे.

भारतीय जनता पक्षाच्या गिरिराज सिंह यांनी मंदिरा बाबतचे विधान केले होते त्यानंतर डीएमके नेता ए राजा बाबरी मशिदीच्या समर्थनार्थ उतरले आहेत. राजा यांनी १२ वर्षे संपत्तीवर हक्क असलेल्याला कायद्याचा उल्लेख केला आहे आणि मस्जिदीबाबतच्या आपल्या दाव्याला मजबुती दिली आहे.

ए राजा यांनी सांगितले की जर एखादा व्यक्ती एखाद्याच्या घरात परवानगीने १२ वर्ष राहत असेल आणि करासोबत बाकी प्रक्रिया पूर्ण करत असेल तर ती प्रॉपर्टी त्या व्यक्तीची होऊन जाते असा कायदा आहे. राजा म्हणतात त्या जागेवर ४०० वर्षांपासून मस्जिद आहे आणि ३ लाख वर्षांपूर्वी रामाचा जन्म झाला होता याचाही कोणता पुरावा नाही त्यामुळे हा निर्णय मज्जीदच्या बाजूने जायला हवा. तसेच आम्हाला वाटले नव्हते की काश्मीरच्या विशेष दर्जा बाबत नियम बदलला जाईल परंतु बाबरी बाबत काय होणार हे अजून समजलेले नाही.

रंजन गोगोई हे नोव्हेंबर मध्ये निवृत्त होताहेत त्यामुळे त्या आधी या निर्णयावर निकाल येणे अपेक्षित आहे.