Ayodhya Shri Ram Janmabhoomi land scam । राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा ? अजित पवार म्हणाले..

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अयोध्या (Ayodhya) येथील श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या ((Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust ) माध्यमातून जमीन (Land) खरेदी केलेल्या व्यवहारावर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. तसेच, अयोध्येतील माजी आमदार (Former MLA from Ayodhya) व समाजवादी पार्टीच्या (Samajwadi Party) सरकारमधील राज्यमंत्री तेज नारायण उर्फ पवन पांडे (Tej Narayan or Pawan Pandey) यांनी देखील प्रश्न उपस्थित केला होता. 2 कोटींमध्ये जमीन खरेदीचा व्यवहार झाला, त्यानंतर अवघ्या 10 मिनिटामध्ये साडे अठरा कोटींचा करार कसा झाला ? जमीन खरेदीत घोटाळा Ayodhya Shri Ram Janmabhoomi land scam झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यावरून राजकीय वातावरण तापू लागलं आहे. तर यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister of Maharashtra) तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुद्धा या विषयावर भाष्य केलं आहे. ते पुण्यात (Pune) बोलत होते.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

वस्तुस्थिती जनतेला कळायला हवी People should know the truth
पुण्यात प्रसारमाध्यमाशी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी विविध विषयावर भाष्य केलं. त्यासोबतच अयोध्येतील राम मंदिर जमीन खरेदी घोटाळ्या (Ram temple land purchase scam) संबंधी होत असलेल्या आरोपावर देखील अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, जनतेने राम मंदिरासाठी (Ram temple) हातभार लावला आहे.
एवढा मोठा आरोप (Allegation) होत असेल तर वस्तुस्थिती जनतेला कळायला हवी.

सत्य समोर आले पाहिजे The Truth Must be Confronted
अयोध्येतील मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा झाल्याच्या आरोपानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी (Congress leaders Rahul Gandhi, Priyanka Gandhi),
शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी देखील निशाणा साधला आहे.
तसेच, सत्य समोर यायला पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे.

Gangstar Gaja Marne ! गजा मारणे सेलिब्रिटी आहे का ?; उच्च न्यायालयाने फटकारले

आम आदमी पक्षाचा आरोप Aam Aadmi Party Allegation
2 कोटींची खरेदी आणि साडे अठरा कोटींचा करार या दोन्ही व्यवहारांमध्ये राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य (Member of Ram Janmabhoomi Trust) अनिल मिश्रा (Anil Mishra) हे साक्षीदार आहेत.
तसेच, याचप्रकारे दान केलेल्या पैशातून 16 कोटी हडपले गेले आहेत.
हे मनी लॉंड्रिंगचं प्रकरण (Money laundering case) आहे.
याबाबत तातडीने CBI अथवा ED यांच्या द्वारे चौकशी करण्यात यावी असं नीट संजय सिंह यांनी केली.

केंद्र सरकार आणि RSS कडे रिपोर्ट (Report to Central Government and RSS)
अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या जागेच्या खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याच आरोपांमुळे राम मंदिर ट्रस्ट (Ram Mandir Trust) मोठ्या अडचणीत सापडलं आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनं (Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust) आता या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट केंद्र सरकार (Central Government) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) पाठविण्यात आल्याची माहिती पुढं आली आहे की,
या रिपोर्टमध्ये ट्रस्टनं विरोधकांचं कट रचला असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

Pune News | हडपसर परिसरात दुचाकीचा पाठलाग करत डोळ्यात मिर्ची पुड टाकून लुटले

राम मंदिर ट्रस्ट म्हणाले..
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनं रिपोर्टमध्ये जमीन खरेदी बाबत वस्तुस्थिती मांडली आहे.
खरेदी करण्यात आलेली जमीन मोक्याच्या ठिकाणी असल्याने जमिनीचे दर जास्त असल्याचं रिपोर्टमध्ये उल्लेख केला आहे.
ज्या जमिनीची खरेदी झाली आहे.
ती 1423 रुपये प्रतिस्वेअर फूट दराने खरेदी करण्यात आल्याचे म्हटले आहे.
या जमीन खरेदीसाठी आज नाही तर मागील 10 वर्षांपासून चर्चा सुरू होती.
यात एकूण 9 लोकांचा समावेश आहे, असे देखील त्यामध्ये उल्लेख केला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : Ayodhya Shri Ram Janmabhoomi land scam scam land purchase transaction ram temple ajit pawars big statement

हे देखील वाचा

चीन्यांना भारतीयांनी दिले सडेतोड उत्तर; 43 % लोकांनी खरेदी केल्या नाहीत चीनी वस्तू

Pune Crime Branch | जबरी चोरी करणार्‍या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक