अयोध्या : सुन्नी वक्फ बोर्डानं स्विकारली 5 एकर जमीन, ‘मशिदी’च्या ऐवजी उभारणार ‘शाळा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एकीकडे राम मंदिर निर्माणासाठी ट्रस्ट (न्यास) उभारण्यात आले आहे, तर दुसरीकडे सुन्नी वक्फ बोर्डला जमीन देण्याच्या प्रस्तावाला उत्तर प्रदेश सरकारच्या कॅबिनेटने मंजुरी दिली. अयोध्येच्या सोहावल भागातील धन्नीपूर गावात सुन्नी वक्फ बोर्डला 5 एकर जमीन देण्याचा प्रस्ताव पारित केला आहे.

अयोध्या प्रशासनाच्या सूत्रांनुसार, धन्नीपूरमध्ये सुन्नी बोर्डला मस्जिदसाठी देण्यात आलेली जमीन पसंत पडली आहे. सुन्नी वक्फ बोर्डने अयोध्येच्या धन्नीपूरमध्ये मस्जिदसाठी प्रस्तावित जमीन मंजूर केली आहे. सुन्नी बोर्डच्या सूत्रांनुसार या 5 एकर जमीनीवर ते मस्जिद ऐवजी शिक्षण संस्था तयार करणार आहे. तसेच हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणून एखाद्या संस्थानाची निर्मिती करण्यात येईल.

सुन्नी वक्फ बोर्डाच्या सूत्रांनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांना सरकारकडून जमीन देण्यात येणार आहे, त्यात त्यांच्या पसंतीचा कोणताही पर्याय नाही परंतु प्रस्तावित जमीन चांगली आहे. सुन्नी वक्फ बोर्डचे पहिल्यापासून असेच म्हणणे आहे की ते सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वीकारतील. त्यामुळे बोर्डने सर्वोच्च न्यायालयात पूनर्विचार याचिका किंवा क्युरेटिव्ह याचिका दाखल केली नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करुन बोर्डने जमीन स्वीकारली आहे. उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येतच धन्नीपूर गावात जमीन देण्याचे सांगितले होते.