राम मंदिरावर न्यायालयाच्या निकालापुर्वी दिल्या सर्व राज्यांना ‘मार्गदर्शक’ सूचना, अयोध्यावर ‘ड्रोन’नं ‘वॉच’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्येच्या विवादावरुन सर्वोच्च न्यायालयात निर्णय होणार असल्याने अयोध्या प्रशानस सतर्क झाले आहे. पंच कोसी परिक्रमेसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे, अयोध्येवर ड्रोनने नजर ठेवली जाणार आहे. अयोध्ये प्रकरणी शांततेच्या संदेश देणाऱ्या अनेक समित्या तयार करण्यात आल्या आहेत. या समित्यांतील लोक विविध जिल्ह्यांत गावा-गावांत जाऊन शांततेचा आणि प्रेमाचा संदेश देतील. अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थानिक पातळीवर अस्थायी तुरुंग निर्माण करण्यात आले आहे. शाळांना आणि खासगी इमारतींना अस्थायी तुरुंगात रुपांतरीत करण्यात आले आहे. अयोध्येत सर्व दल तैनात करण्यात आले आहेत.

सर्व राज्यात सुरक्षा अ‍ॅडवायजरी
गृह मंत्रालयानुसार सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येचा निर्णय पाहता गृहमंत्रालयाने सर्व राज्यात अ‍ॅडवायजरी पाठवली आहे. सर्व राज्यात अलर्ट देखील देण्यात आले आहेत. अतिरिक्त सुरक्षेसाठी गृह मंत्रालयाने अर्धसैनिक दलाच्या 40 तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. या 40 तुकड्यांमध्ये 4000 पॅरा मिलेटरीचे जवान आहेत.

केव्हा येईल निर्णय
अयोध्येच्या निर्णयाची तारीख जवळ येत आहे. सुनावणीवर सर्व पक्षांच्या वकीलांचे दावे ऐकून पुराव्याची पडताळणी करुन निर्णय घेण्यात येईल. सध्या चर्चा ही आहे की निर्णय कोणत्या तारखेला येईल. काही लोकांच्या मते निर्णय शुक्रवारी 8 नोव्हेंबरला दुपारी साडे तीन पर्यंत येईल. तर काहींच्या मते सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांचे विशेष पीठ मंगळवारी 12 नोव्हेंबरला निर्णय देईल. म्हणजेच 13 ते 16 नोव्हेंबर दरम्यान कधीही हा निर्णय येईल.

13 किंवा 14 नोव्हेंबरपर्यंत निर्णय येण्याची शक्यता जास्त आहे. न्यायलायाच्या कार्य दिवसांचा विचार केला तर 7 आणि 8 नोव्हेंबर आहे. 11 आणि 12 तारखेला सुट्टी आहे. तर कार्तिक पौर्णिमेनंतर न्यायालय 13, 14 आणि 15 नोव्हेंबरला सुरु होईल. 16 नोव्हेंबरला शनिवार आहे, 17 ला रविवार. सरन्यायाधीश रंजन गोगोई रविवारी निवृत्त होतील.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like