अयोध्यामध्ये मशिदीसाठी ‘या’ हिंदू व्यक्तीनं दिली 5 एकर जमीन देण्याची ‘ऑफर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुप्रीम कोर्टाने राममंदीराबाबत निर्णय देताना सुन्नी वक्फ बोर्डाला पाच एकर जागा मशिदीसाठी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता याविषयी सुन्नी वक्फ बोर्ड कायदेशीर सल्ला घेऊन हि जमीन घ्यायची कि नाही हे ठरवणार आहे. याचदरम्यान अयोध्येतील राजनारायण दास यांनी या मशिदीसाठी पाच एकर जागा दान देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सोहावल तालुक्यातील मुस्तफाबाद गावातील रहिवासी असलेल्या राजनारायण दास यांनी रोडच्या नजीक असलेली त्यांची पाच एकर जमीन मशिदीसाठी देण्यास तयारी दर्शवली असून लवकरच ते यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन हि ऑफर देणार आहेत.

Ayodhya land man

अयोध्या प्रशासन पाच एकर जमिनीच्या शोधात –

सुप्रीम कोर्टाने राममंदिरासाठी 2.77 एकर जागा देण्याचे आदेश दिले होते. तसेच सुन्नी वक्फ बोर्डाला मशीद बांधण्यासाठी पाच एकर जागा अयोध्येतच देण्याचे देखील आदेश दिले होते. त्यानंतर आता अयोध्या प्रशासन या जागेच्या शोधात असून लवकरात लवकर हि जागा शोधण्याचा प्रयत्न करत आहे. यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांनी पाच तहसीलदारांना अहवाल मागितला असून अनेक नागरिकांनी यासाठी जमीन देण्याची ऑफर दिली आहे.

Visit : Policenama.com