‘रामनामा’वर देशभर डंका गाजविलेल्या ‘भाजप’ने अखेर ‘अयोध्ये’त प्रथमच फुलवले ‘कमळ’ !

अयोध्या : वृत्त संस्था – रामनामावर (Ramnama) भाजप (BJP) ने संपूर्ण देशभरात आपला डंका वाजविला आहे. लागोपाठ दोन लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) जिंकण्यामध्ये रामनामा (Ramnama) चा नारा अतिशय महत्वाचा ठरला होता. मात्र, खुद्द अयोध्ये (Ayodhya) त आजवर भाजपला कधी विजय मिळाला नव्हता. आताही ४० सदस्यांच्या जिल्हा परिषदे (Zilla Parishad) त भाजपचे केवळ ८ जण निवडून आले होते. पण, पडद्यामागच्या खेळात पारंगत असलेल्या भाजपाने १६ सदस्य असलेल्या समाजवादी पक्षाला मात देत अयोध्या जिल्हा परिषदे (Ayodhya Zilla Parishad) त आपला अध्यक्ष निवडून आणला.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister of Uttar Pradesh Yogi Adityanath) यांच्याविषयी नाराजी असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले असले तरी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्याचा भाजपाला फटका बसला नाही. ७५ पैकी ६७ जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष निवडून आले आहे. मात्र, अयोध्येची बातच वेगळी होती. येथे भाजपचे केवळ ८ सदस्य निवडून आले होते. समाजवादी पक्षाचे १६, रालोद १, ४ बसपा आणि ११ इतर असे संख्याबळ होते. समाजवादी पार्टीला बहुमतासाठी केवळ ५ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक होता.

भाजपने ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या आलोकसिंह रोहित यांची पत्नी रोली सिंह यांना उमेदवारी दिली होती तर, समाजवादी पार्टीने माजी मंत्री आनंद सेन यांची पत्नी इंदू सेन यांना उमेदवारी दिली होती. भाजपने पडद्यामागे इतक्या खेळ्या केल्या की रोली सिंह या केवळ निवडूनच आल्या नाहीत तर त्यांनी समाजवादी पार्टीची मतेही मिळवून दाखविली.

देशभरात भाजपाविरोधात प्रादेशिक पक्षांची एकजुट करण्याचे प्रयत्न दिल्लीत सुरु असताना स्थानिक पातळीवर काँग्रेस,
बसपा व इतरांनी भाजपशी पडद्याआड समजोता करुन अयोध्येत प्रथमच भाजपचा उमेदवार अध्यक्षपदी निवडून दिला आहे.
अयोध्येत आपला जिल्हा परिषद अध्यक्ष नसल्याची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना कायम सल वाटत होती. राजकारणाच्या या फोडाफोडीतून भाजपने अखेर अयोध्येवरही भगवा फडकविला

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update


Web Title : ayodhya up panchayat election result bjp won sp defeated

हे देखील वाचा

Anil Deshmukh | अनिल देशमुख यांच्यासह त्यांच्या मुलाला ईडीचे समन्स; 2 दिवस होणार चौकशी

भिवंडीतील निजामपुरा कसाई वाड्यात पोलिसांना बेदम मारहाण

Bhiwandi Crime News | आरोपीच्या मृत्युनंतर जमावाची पोलिसांना बेदम मारहाण; भिवंडीतील निजामपुरा कसाई वाडा येथील व्हिडिओ व्हायरल (Video)

Vasai Virar MNC Recruitment-2021 | वसई विरार महापालिकेत कायदे तज्ज्ञांची पदभरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख