वादग्रस्त जागा रामलल्लाचीच, वक्फ बोर्डाला अयोध्येत 5 एकर जमीन द्यावी : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर आज सकाळी 10:30 वाजता प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे. पुरातत्व विभागाचे दावे कोर्टाने ग्राह्य धरत प्रभू रामाचा जन्म अयोध्येतलाच, याबाबत कोणताही वाद नाही हे मान्य केले आहे.

तसेच फैजाबाद कोर्टाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या शिया वक्फ बोर्डाने दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. या जागेवर दावा सांगणारा कोणताही पुरावा सुन्नी वक्फ बोर्डाला सादर करता आला नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.

रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल आज लागणार आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, ब्रिटिश येण्यापूर्वी राम चबूत्रा, सीता रासोई यांची हिंदूंनी उपासना केली होती याचे पुरावे आहेत. पुरावा असे दर्शवितो की विवादित जमिनीचा बाह्य भाग हिंदूंच्या ताब्यात होता.

अयोध्येला प्रभू राम यांचे जन्मस्थान मानतात, त्यांच्या धार्मिक भावना आहेत, मुस्लिम त्याला बाबरी मशीद म्हणतात. प्रभू राम यांचा येथे जन्म झाला असा याबाबत कोणताही वाद नाही. बाबरी मशीद रिकाम्या जागी बनली नव्हती, मशिदीच्या बांधकामात जुन्या दगडांचा वापर होता. पुरातत्व विभागाने केलेल्या सर्वेक्षणात 12 व्या शतकातील अवशेष सापडले होते. अवशेष इस्लामिक कलाकृतीचे नव्हते.

वादग्रस्त जागा ही रामलल्लाची असल्याचे सांगत या जागेवर मंदिर उभारण्यासाठी येत्या 3 महिन्यात ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्याच बरोबर मुस्लिमांना अयोध्येतच 5 एकर जागा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Visit : Policenama.com 

You might also like